अफगाणिस्तानातील सद्य परिस्थिती
"अफगाणिस्तानातील सद्य परिस्थिती"
श्री.विजय लिमये(9326040204) यांची अमेरिकेच्या (US) अध्यक्षांच्या अफगाणिस्तानातील सद्य परिस्थिती वर केलेल्या भाषणावरची प्रतिक्रिया ऐकून मन सुन्न होऊन गेले.
श्री.बायडन म्हणाले,वीस वर्षाच्या काळात अमेरिकेला जे जे शक्य आहे ते सर्व अफगाण सैनिकांना दिले. आमच्या सैन्याने अफगाण सैन्याला उत्कृष्ट प्रशिक्षण दिले, आधुनिक शस्त्र, अस्त्र दिली, लढण्यासाठी उत्तम सैन्य पोशाख व साधन सामुग्री दिली. जवळपास तीन लाख अफगाण सैनिक तयार केले, त्यांना आम्ही काय देऊ शकलो नाही तर ते, म्हणजे लढण्याची हिम्मत, व इच्छाशक्ती.
वास्तविक अफगाण सेना, तालिबानच्या सैन्यापेक्षा कितीतरी पट जास्त असताना, अफगाण सैन्याने शस्त्र का टाकली? रक्ताचा थेंब न पाडता तालिबान ने काबुल घेतले. तालिबानकडे फारसे मनुष्यबळ नाही, जे काही होते ते म्हणजे खटारा गाड्या, काही बंदुका, थोडा फार दारू-गोळा, बरेचसे अनवाणी किव्वा चपला घातलेले पण प्रचंड इच्छाशक्ती असलेले व देश काबीज करण्यासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब सांडण्यास तयार असलेल्या अप्रशिक्षित सैन्य. अश्या सैन्याला पाहून चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर असल्याचा भास झाला, इतके गबाळे, गचाळ, रानटी, गलिच्छ, सैन्यासमोर अमेरिकेसारख्या बलाढ्य सेनेने प्रशिक्षण दिलेले अफगाण सैन्याने शरणागती पत्करली, हा अमेरिकेचा पराभव नसून जगाचा पराभव आहे.
श्री.बायडन काय बोलले ते महत्वाचे आहेच, त्या शिवाय त्रिकोणाच्या चौथा कोन शोधण्याचा प्रयत्न ही करता आला पाहिजे. गोष्ट खरी आहे का खोटी हे माहीत नाही, पण वडीलधाऱ्या व्यक्तीने सांगितली, ज्याचे मर्म जाणून घ्या.
सन १९६२, भारत चीन युद्धाचा भडका उडणार, हे जवळजवळ ठरलेले होते.घाबरट नेहरू अजून घाबरले. त्यांनी सोवियत युनियन (रशिया) कडे मदत मागितली. भारत रशिया मैत्रीची आठवण करून दिली.काही उपयोग झाला नाही.रशियाने मदत करण्यास सपशेल नकार कळवला.त्यांनी फार मार्मिक उत्तर दिले - मान्य आहे ...... भारत व सोवियत युनियन मित्र आहे.... पण सोवियत युनियन व चीन भाऊ आहेत..... (Blood is thicker than water) म्हणून आमच्याकडून तुम्हाला कोणतीच मदत मिळणार नाही. साडेतीन हजार भारतीय सैनिकांची आहुती दिली गेली.भारत युद्ध हरला.नेहरूंनी वास्तविक शरमेने पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला हवा होत.हिंदी चिनी भाई भाईची जप माळ ओढणारे,लोचट होऊन खुर्चीत चिकटून राहिले.असो !
आता परत मूळ मुद्यावर येतो, अफगाण सैनिकांनी युद्ध या साठी टाळले कारण त्यांना माहीत होते, तालिबान सैन्य युद्ध करण्याच्या इराद्यानेच वेशीवर पोहोचले आहे, केवळ ठिणगी उडायचा अवकाश आहे, घनघोर युद्ध होईल, त्यात कदाचित अफगाण सैन्य जिंकू शकेल, पण आम्ही कुणाला मारणार आहोत, आमच्याच बांधवाना? अमेरिकी सैनिक तर पळाले.आता आमच्यात भांडणे व लढाई होऊन काही आमचे व काही त्यांचे सैन्य धारातीर्थी होणार.जमीन रक्ताने चिंब भिजणार.रक्ताने मातीचा चिखल होणार.हे सर्व रक्त कोणत्याही बाजूचे असुदे.ते अफगाणी रक्त असणार. इस्लामी रक्त असणार(ब्लड इज थिकर द्यान वॉटर).सोडून द्या, आपलेच आहेत,देऊन टाका,त्यांचे स्वागत केले,आणि युद्ध संपले.
समझने वालों को इशारा काफी है। भारतीयांनो येतंय का लक्षात? जात्यात जाणारे रडतात, सुपात असणारे बेफिकीर असतात.रात्र वैऱ्याची म्हणतात.पुढचे दिवस व वर्ष वैऱ्याचे असतील.आता पुढील कित्येक दशक, कोणताच देश अफगाणिस्तान मध्ये पाऊल ठेवणार नाही. तालिबानच्या रूपाने भस्मासुर उदयास आला आहे.काळे ढग पश्चिमेला जमायला लागतील.तयारीला लागा.इतकेच सांगणे आहे.
Comments