अहिराणी तडका
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
समस्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची "अहिराणी" भाषा
ज्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांच्या गेल्या काही पिढ्या आपला "मामाचा गाव" सोडून मोठ्या शहरात स्थायिक झालेल्या आहेत त्यांच्या माहितीसाठी समस्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांच्या "अहिराणी" या बोली भाषेचा एक नमुना त्याच्या मराठीतील भाषांतरासह खाली देत आहे:-
"अहिराणी" या बोली भाषेचा एक नमुना :- यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याना शेपले मुडना काटा. तो सांगे, ‘नाइभाऊ, नाइभाऊ, मना काटा काड दे.’ ‘नै भाई,’ म्हने, ‘मी काय तुना काटा काडत नै’ म्हने. ‘नै रे भाऊ’ म्हने, ‘तसे कोठे होवाल ग्ये का’ म्हने.‘काड त खरी काटा’ म्हने.‘मङ’ म्हने, ‘आते हट्ट धरस. काडू दे’ म्हने,‘याना काटा काडू दे.’
भाषांतर :- एक होता सरडा. तो फिरायचा कुंपणाकुंपणावर. त्याच्या शेपटीत मोडला काटा. तो म्हणायला लागला, ‘न्हावीदादा, न्हावीदादा, माझा काटा काढून दे.’ ‘नाही बाबा’ (न्हावी) म्हणाला, ‘मी काही तुझा काटा काढत नाही’ म्हणाला.‘नाही रे बाबा’ (सरडा) म्हणाला, ‘तसं कुठे झालंय का’ म्हणाला. ‘काढ तर खरं काटा’ म्हणाला.‘मग’ (न्हावी) म्हणाला, ‘आता हट्ट धरतोस. काढू दे’ म्हणाला, ‘ह्याचा काटा काढू दे.’
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
एम.डी.
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments