अहिराणी मातृभाषा
- dileepbw
- Sep 20, 2022
- 3 min read
"आखाजी(अक्षय तृतीया)" हा खान्देशवाशी लाड सका (शाखीय) वाणी समाजाचा अत्यंत महत्वाचा सण !
या सणाच्या निमित्ताने दै.देशदूत,नाशिक मध्ये प्रकाशित झालेला लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री. दिलीपजी कोठावदे,नाशिक यांचा हा लेख सर्वांनी अवश्य वाचावा.ही नम्र विनंती.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या मध्य आशियातील "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा हा स्मरण दिन !
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.गिरीष भाऊ वाणी, पारोळा,जि.जळगाव यांनी लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "अहिराणी" या मातृभाषेत पाठविलेली "आखाजी (अक्षय तृतीया)" या सणाची खालील माहिती या समाजाच्या इतिहासावर व संस्कृतीबद्दल बरेच काही सांगून जाते:-
"जळगाव,धुळे,नंदुरबार या जिल्हास्ना भाग म्हणजे खान्देस ! वैशाख शुद्ध तृतीयाले आखाजी अस म्हणतस.
आखाजी ना रोज परशुराम ना जन्म व्हयेल से.
"तयारी आखाजीनी"
खान्देशनी प्रत्येक बाई वडे, पापड, कुरड्या, सेवाया काराम्हा मग्न रातास.आखाजीना सनसाठे घर मधला पात्रसना डब्बा, भांडा, चादरी, गोधड्या नदीवर ली जैसन धुई आंतस.आखाजी साठे प्रत्येक ना घर "संजोरया" आणि "घुन्या" करतस.
"आखाजी पितरांची"
आखाजी जस मौज मा ना दिवस से तसा आपला पुर्वजासले याद कराना दिन से !
श्राद्ध पूजन हाई दोन परकार न से ! ज्याना माय किंवा बाप मरणात तो पहिला वर्षाले जे श्राद्ध घालतस !
तेले "डेरग पूजन" आस म्हणतास .
जर एक वर्षापेक्षा जास्त दिन झायात तर तेले "घागर पूजन "अस म्हणतस.
मडकामा पाणी भारीसन तेनावर लोटा ठेवतस. त्या लोटावर सांजोरी ठेवतस व निवध ठीसनी पूजा करतस.
चुला म्हा निवध ताकाथस तेले "आगारी" म्हणतस !
दुस रावाडना लगन व्हयेल मानुसले जेवाले बलावतस ! तेनी पूजा करतस तेले "पित्तर" म्हंतस.
"आखाजी स्री मुक्तिनी "
जस जस उन्हायान उन पडस तस तस नवीन लग्न व्हयेल बाई ले माहेर न मुई येवणी वाट देखस.
आखाजीले माहेरले जाईसनी झोकावर बसीसन सासर ना सुख दुखना गाना म्हनस.
आखाजी ना सन बाई साठे पूर्ण स्वतंत्र ना दिवस ऱ्हास.
हसन,खिंदळन,झोका वर बसन,गाना म्हणन या सर्वा इच्छा पुऱ्या करणा दिवस !
सासर ले सासू सासरा, दिर, ननद, जेठ यासना समोर ते स्वतंत्र भेटन शक्य नही म्हनिसन आखाजीले माहेर ले तो आनंद लेतस.
"गौराई उत्सव" खानदेश मा से !
सर्व पोरी एकत्र येथस गौराईन पाणी आणा साठे गाव जवळ ना आंबा ना झाड खाले जमा व्हतस.
गौराई ना गाना म्हणतस.
गाव मधून जातांना एक पोर ले माणूस ना कपडा घलतस. पेंट,शर्ट ,गॉगल हातमा पुस्तक डोकावर छत्री धरेल ऱ्हास. तेले "मोगल" आस म्हणतस.
"आखाजी स्वतंत्र ना दिवस"
खान्देशम्हा आखाजी सर्वासले बंधन मुक्ती ना दिन.
आखाजीले तरुण पासून ते म्हतारा पोरे सोरे सले पत्ता, जुगार, पैसा खेवाले पूर्ण मुभा ऱ्हास.
आखाजीले शेतकरी सालदार लावस. सालदारकी न साल पण आखाजीले ठरस.
असा खान्देशना खान्देशी सण आखाजीना !
सर्वासले आखाजी आनंद मा जावो !
सर्वासन्या इच्छा पुऱ्या होवोत ! "
समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना "आखाजी (अक्षय तृतीया)" च्या हार्दिक शुभेच्छा !
आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लाड सका (शाखीय) वाणी समाजाची मातृभाषा "अहिराणी" या भाषेचा इतिहास जाणून घेणे योग्य ठरेल.
"अहिराणी" भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे.
अहिराणी भाषा म्हणजे भगवान श्रीकृष्णदेवांचा आशिर्वाद आहे.महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्रीकृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्रीकृष्णदेवांचा विजय झाला.चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहून द्वारकेला पळाले.म्हणून त्यांस "रणछोडदास" असे देखील म्हणतात.
हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता.खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशूपाल खुपच रमले.
या पशूपालांना "अहिर" असे म्हणत. आणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे "अहिराणी" भाषा होय.
पुढे द्वारकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिला.श्रीकृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केली. त्यांनी आपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिले. "कन्हैयाचा कान्हदेश" ! पुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश "खान्देश" असा झाला.
या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवली. तिचे नाव नंद दरबार व पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला.खान्देशात महाभारतातील कौरव व पांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत.ती पुढीलप्रमाणे : -
नन्द राजाच्या नावावरून *नंदुरबार*
धर्म च्या नावावरून *धमानं*
भीमच्या नावावरून *बामनं*
अर्जुन च्या नावावरून *जूनून*
जयद्रथ च्या नावावरून *जैतान*
श्रीधर च्या नावावरून *शिरपुर*
कुंमुदा च्या नावावरून *कुंकरमुंडा*
गोविन्दा च्या नावावरून *वैदान*
अस्वत्थामा च्या नावावरून *आस्तान*
बलराम च्या नावावरून *बळसान*
दुशासन च्या नावावरून *दूसान*
श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे.भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होते. या नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहे. याच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली.त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव "सारंगखेडा" !
प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण ! श्रीकृष्णाची जात "अहीर" होती.या अहिरांची भाषा ती अहिराणी !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)
Comentários