top of page

अहिराणी व भिल्ली

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा

भाषातज्ञ श्री.जॉर्ज ग्रीअर्सन (कृपया फोटो पहा) यांच्यामते मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा ही एक "भिल्ली" बोली असून, त्यांनी “लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया”(The Linguistic Survey of India, often referred to as the LSI, is a comprehensive survey of the languages of British India, describing 364 languages and dialects.It was a project the Government of India conducted between 1894 and 1928, under the direction of George A. Grierson, a member of the Indian Civil Service) च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात इतर "भिल्ली बोलीं" बरोबर महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या “खानदेशी/अहिराणी" भाषेचा उल्लेख केला आहे.

कशी आहे ही "भिल्ली" भाषा ?

सातपुडा पर्वताच्या पश्चिमेला राहणारे "भिल्ल" ना "मराठी" बोलत ना "हिंदुस्तानी" ! ते फक्त "गुजराती" भाषा बोलतात. तर सातपुडा पर्वताच्या पूर्वेला राहणारे "भिल्ल" गुजराती भाषेपेक्षा वेगळी अशी "नेमाडी" भाषा बोलतात.

या "नेमाडी" भाषेचे वैशिष्ट्य असे की उच्चार करायला अवघड असलेल्या सर्व कठोर व्यंजनांचा त्याग करायचा. त्यामुळे "नेमाडी" भाषेत “माळी” होतो "माई” तर “कोळी” होतो "कोई" ! गूळ होतो "गुई" तर वाघदेव होतो "वाईजो' !

(संदर्भ:- Mr.Sinclair in Ind. Ant. IV. 100).

या "भिल्ल" लोकांकडून "लाड सका (शाखीय) वाणी समाजा" तील व्यापारी वन संपत्ती (डिंक,लाख,मोहाची फुले,मध,इमारती व जळाऊ लाकूड इ.) गोळा करून मोठ्या शहरात नेउन विकत असत.

(संदर्भ:- श्री. हर्बर्ट रिसले).

या दैनंदिन व्यावसायिक संपर्कामुळे काही "भिल्ली" भाषेतील शब्द "लाड सका (शाखीय) वाणी" समाजाच्या "खानदेशी/अहिराणी" भाषेत शिरले असावेत.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा...

 
 
 
अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page