आपले व्यवसाय- शेती,व्यापार व सावकारी
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या इतिहासात "धोलविरा" या सिंधू संस्कृती मधील शहराचे महत्व अनन्य साधारण आहे.
मध्य आशियात कंदमुळे खाऊन व पशुपालन करून जगणारे लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज हिमालय पर्वत ओलांडून भारतात स्थलांतरित झाले व क्रमाक्रमाने शेती,व्यापार व सावकारी या व्यवसायांकडे वळाले.
सुरवातीला "बहिस्थ" म्हणून गणले गेलेले हे "सका" वंशाचे लोक काळाच्या ओघात सिंधू संस्कृतीशी कसे एकरूप झाले त्याचा इतिहास या अभ्यास गटात दिलेला आहे. तो सर्वांनी अवश्य वाचावा ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६५५०)




Comments