top of page

इतिहास

  • dileepbw
  • Jan 3, 2022
  • 1 min read

प्रसिद्ध इतिहासकार ई.एच.कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे "इतिहास" ! टाईमबी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात. इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते.मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतका

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ


"पुराणकथा" या एकेकाळचा '"इतिहास" आहेत

राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात:-


"स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |"


(परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे.

भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित "छांदोग्योपनिषद" या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.


धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||


(श्रीधर स्वामी कृत विष्णु पुराण टीका)


अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात


आधुनिक व्याख्यासंपादन करा


हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page