उच्च शिक्षणासाठी परदेश गमन
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
"सका" वंशाच्या लाड सका(शाखीय) वाणी समाजातील तरूणाई गेल्या काही वर्षात उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर परदेश गमन करीत असल्याचे प्रकर्षाने लक्षात येत आहे.
अशा सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सुरक्षेच्या तसेच समाज उद्धाराच्या व पुढे परदेश गमन करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच हितासाठी
परस्परांच्या संपर्कात रहाण्याची नितांत आवश्यकता आहे.त्यासाठी त्यांनी संपर्काच्या अधुनिक साधनांचा वापर करून आपला गट स्थापन करायला हवा.
हजारो वर्षे व्यापार,सावकारी व शेती हे पारंपारिक व्यवसाय करणारा "सका" वंशाचा लाड सका(शाखीय) वाणी समाज गेल्या दीड दोन शतकात विद्यार्जन व विद्यादान या क्षेत्राकडे वळाला व या क्षेत्रात देखील या समाजाने आपले भरीव योगदान द्यायला सुरुवात केली आहे याचा दाखला म्हणजे समाजातील अशा विद्यार्थ्यांची वाढती संख्या !
तुलनेने हे परदेश गमन या समाजाला नवीन असल्याने या क्षेत्रात नेत्रदीपक योगदान देणार्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्यच आहे.
अशा विद्यार्थ्यांसाठी समाजाने एक व्यासपीठ निर्माण करावे.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ५९९८)
Comentarios