top of page

ऋषिका जमातीचे लाडशाखीय वाणि

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास

सध्याच्या अफगाणिस्तानमधील "अमू दरिया"(ग्रीक इतिहासातील "ऑक्सस" नदी, महाभारतातील "वाम्क्षु" नदी) नदीच्या काठाने प्रथम पशुपालन, नंतर कृषी व व्यापार हा व्यवसाय करणारे,"सका/शक/Scythian" वंशाच्या,"ऋषिका" या जमातीचे लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधव पाकिस्तान,काश्मीर, हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात व शेवटी महाराष्ट्रामध्ये नर्मदा, तापी, गिरणा इ. नद्यांच्या खोऱ्यात स्थिरावले.

या जनसमूहामधील "देव" कुलाचे बरेचसे घटक मुख्यतः जळगाव जिल्यामधील चाळीसगाव तालुक्यातील 'पिलखोड" (Coordinates: 20°31'54"N 74°49'1"E, PIN Code - 424101), या चाळीसगाव पासून २० कि.मी अंतरावरील, "गिरणा" नदीच्या काठावरील गावामधे येउन स्थिरावले.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page