ओसवाल/ओस्तवाल वाणी नावे
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
"ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजामधील पुरुषांची नावे सर्व साधारणपणे भगवान, पुनम, नहर, माणिक अशी तर स्त्रियांची नावे सर्व साधारणपणे चांदकुवर, जमनी, केसर, कस्तुरी, मोती, राजकुवर, रंभा, साखरी, सूर्यकुवर अशी आढळतात.
"ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजामध्ये स्त्रीच्या नावामागे "बाई" व पुरुषांच्या नावामागे "चंद(चंद्र), दास(सेवक), लाल(आवडता), मल(वीर)" अशी आदरार्थी नावे लावण्याची प्रथा आहे. वयाने ज्येष्ठ असलेल्या पुरुषांना आदराने "बाबाजी,काकाजी" असे संबोधले जाते.
बाहिरा,भलगट,भंडारी,चंदगिरे,चोपडे,गाढे,गाढते,गांधी,गुगळे,गुलेचा,कोठारी,लोढा,लुकद्रप, मिणी, मुथा,शिंगी,सिंगवी,सुराणा, वागमार अशी "कुलनामे" "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजात सर्व साधारणपणे आढळतात.
"ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजामध्ये एकाच कुलनामाच्या व्यक्तीनी परस्परांशी विवाह संबंध प्रस्थापित करण्यास समाज मान्यता नाही.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments