top of page

ओसवाल वाणी - हलारी व वागड

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात व त्यानंतर राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "ओसवाल वाणी" समाज

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतातील राजस्थान राज्यातील,जोधपुर जिल्ह्यातील "ओस्सिया/ओसिया" येथे स्थलांतरित झालेला "ओसवाल वाणी" समाज,काळाच्या ओघात कच्छचे रण ओलांडून गुजरातमधील,काठेयावाड प्रांतातील,"हलार(सध्याचे जामनगर)" येथे स्थलांतरित झाला.

या स्थलांतराच्या मार्गावरील विविध भौगोलिक स्थानानुसार "ओसवाल वाणी" समाज हलारी व वागड अशा भौगोलिक गटात व अनुवंशशास्त्रानुसार "दसा" व "बिसा" अशा उपगटात विभागला गेला.

मध्य आशियात वास्तव्याला असताना निसर्गपूजक असलेला "ओसवाल वाणी" समाज युद्धातील प्रचंड हिंसा पाहून अहिंसावादी "जैन" धर्माकडे वळाला व "जैन गच्छ" म्हणून ओळखला जाऊ लागला.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय)...

 
 
 
खाडाईत वाणी

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजासारखाच गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "खाडाईत वाणी" समाज खानदेशातील...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page