top of page

"कांदा-भजी" व "रम-कबाब"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"कांदा-भजी" व "रम-कबाब"


नसलीने माझा "कांदा-भजी" हा लेख वाचून "रम-कबाब" वर एक "चारोळी" पाठवताच मनजीतला लोणावळा "वर्षा-सहल" करावीशी वाटू लागली आहे तर उदयला गुलाम अलींची "हंगामा क्यू हैं बरपा" ही गझलच आठवली.त्यावर चंदूला त्याची "तिकोना-तुंगी ट्रेक" व तेव्हा घेतलेला "रमचा आस्वाद" आठवून त्यानेच एक गजल रचली आहे.ऐका.

माना कि "रम-कबाब" का नहीं है जवाब।

मगर "चाय-भजियों" का कम नहीं रुबाब।

"रम-कबाब" में हैं माशूकाके गालों के गुलाब।

"चाय-भजिये" मे हैं गजरेकी खुशबू लाजवाब।

चंदूची ही स्वरचित गजल ऐकताच मनजीतला देव-वहिदाचे प्रेमपुजारीमधले "शोखियोंमें घोला जाए" हे गीत आठवले तर मला आमच्या हाॅस्पिटल बॅचची "लोणावळा वर्षा-सहल" आठवली.वाचा तो किस्सा !

वाचासुंदरला सर्वांना कामाला लावून स्वत:ला मात्र त्यापासून "अलिप्त" रहाण्याची वाईट खोड बालपणापासूनच असावी. या सवयीनुसार त्याने एकदा आमच्या हाॅस्पिटल बॅचची "लोणावळा वर्षा-सहल" आयोजित करण्याची टूम काढली. वसतीगृहनिवासी बाळकू,मी व राजा यांच्याकडे पुणे स्टेशनवर जाऊन पुणे-लोकलची तिकीटे काढायची जबाबदारी आली. तर वंदना,जया,सुधा व आशा यांच्याकडे सर्वांसाठी नाश्ता तयार करायची जबाबदारी आली.आम्ही

पुणे स्टेशनवर वेळेवर पोहोचलो.सर्वांची तिकीटे काढली. काही जण शिवाजीनगर स्टेशनवर परस्पर येणार होते. वाचासुंदर सोडून बाकीचे सर्वजण वेळेवर आले.रेल्वे सुटायची वेळ झाली तरी याचा पत्ता नाही.तडफडत व त्याच्या नावाने शिव्या-शाप घालत आम्ही सर्व लोणावळ्याला पोहोचलो.

तेथून पुण्याला वाचाकडे ट्रंककाॅल लावला तर हे महाराज अंथरूणावर लोळत पडलेले.मग तसेच धावत-पळत शिवाजीनगर स्टेशनवर पोहोचले व पुढची लोकल पकडून लोणावळ्याला पोहोचले.आम्ही सर्वजण मक्याची कणसे व चिक्की खात खात बाजारात हिंडत होतो. हे महाराज सिनेमा पहायला जाताना पण "इंटरव्हलला" च पोहोचायचे.त्याची मला व बाळकूला सवय होती.पण मुलींनी मात्र वाचाला उशीर केल्याबद्दल सपाटून बडवला.याने शांतपणे नाष्ट्याचे डबे उघडून त्यावर ताव मारायला सुरूवात केली.सर्व मुली "छत्री" घेऊन आल्या होत्या.त्या याने काढून घेतल्या व स्वत:च्या राहिलेल्या अंघोळीबरोबरच सर्वांनाच "वर्षा-स्नान" घडवले.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page