कुलदेवतांचे स्थलांतर
- dileepbw
- Sep 17, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची संस्कृती
महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा इतिहास अभ्यासला असता असे लक्षात येते की त्यांच्या सर्व "आद्य" कुलदेवता या त्यांच्या विविध कारणाने झालेल्या स्थलांतराच्या मार्गावर विराजमान झालेल्या आढळून येतात.
जसे आपण नवीन घरात सर्व प्रथम "कुलदेवतेची प्रतिस्थापना" करून आपला संसार मांडतो तसेच "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांनी स्थलांतराच्या मार्गावर नैसर्गिकदृष्ट्या सोयीच्या ठिकाणी या "आद्य" कुलदेवता प्रस्थापित केलेल्या आहेत.
त्यामुळे या कुलदेवतांच्या स्थानांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या इतिहासावर बराच प्रकाश पडतो.
"लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या इतिहासाशी सुसंगत असा कुलदेवतांच्या स्थानांचा क्रम सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे :-
१. बलुचिस्तान(पाकिस्तान) - हिंगलज माताजी (कृपया फोटो पहा)
२. कटरा,रेआसी,जम्मू - वैष्णोदेवी माताजी
३. कांगडा,हिमाचल प्रदेश- ज्वालादेवी माताजी
४. विराट,भरतपूर,राजस्थान - अंबिका माताजी
५. जगत,उदयपुर,राजस्थान - अंबिका माताजी
६. चितोडगड,राजस्थान - कालिका माताजी
७. चितोडगड,राजस्थान - कालिका माताजी
८. असलपुर,जोबनेर,राजस्थान - ज्वाला माताजी
९. किंसारीया,पर्बतसर,नागौर,राजस्थान - कैवाई माताजी
१०.भूज,गुजरात - आशापुरा माताजी
११. मोढेरा,अहमदाबाद,गुजरात - "सूर्य मंदिर”
"लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाज जसा महाराष्ट्रात स्थलांतरित झाला तशा त्यांच्या कुलदेवतादेखील महाराष्ट्रात,विशेषतः गुजरात-महाराष्ट्र सीमेवर स्थलांतरित झाल्या.
"लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजातील प्रत्येक कुलबांधवाने आपल्या सध्या पुजल्या जाणाऱ्या कुलदेवतेच्या या स्थलांतराच्या मार्गावरील "आद्य" कुलदेवतेच्या "रूपा" चा शोध घेतल्यास त्यांना आपल्या "कुला" चा इतिहास नक्की सापडेल.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments