top of page

खवय्या-आख्यान(आफ्रिका)

  • dileepbw
  • Feb 3, 2022
  • 1 min read

वयाची "साठी" उलटल्या नंतर खरे तर माझ्या "निव्वळ पर्यटना" ला सुरूवात झाली.तो पर्यत दरवर्षी "अभ्यास व आराम" असे संयुक्त विद्यमाने "पर्यटन" चालायचे.संपूर्ण आयुष्यात रक्तपेढी विज्ञानाची एकही परीषद बुडविलेली नसल्याने संपूर्ण भारत दर्शन झालेले होते.काही आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे समस्त युरोप,समस्त अमेरिका व समस्त तुर्कस्तान देखील पाहून झाले होते.आता फक्त आफ्रिका व आस्ट्रेलिया हे दोनच खंड पादाक्रांत करायचे राहिले होते.त्यासाठी पर्यटनप्रेमी चार साठी ओलांडलेली जोडपी शोधली व या दोन खंडांची सहल आखली.


आतापर्यंत झालेल्या जग प्रवासात मुक्त(पटाया) व बंदिस्त(अमेरिका,इंग्लंड) जलजीवन,बंदिस्त पक्षी( सिंगापूर) व प्राणी जीवन(हैदराबाद) पाहून झालेले होते.मुक्त वन्यजीवन(मसाई मारा) मात्र पहायचे राहिले होते. त्यासाठी "केनया सफारी" ची निवड केली व आठवडाभर मसाई माराच्या जंगलातच मुक्काम ठोकला. जेथे ज्या प्राण्यांची वस्ती तेथे आमची एक रात्र वस्ती ! असे हत्ती,पाणघोडे,मगरी-सुसरी,गेंडे,चिंपँझी,जिराफ,झेब्रा, इ. प्राण्यांच्या घरात जाऊन राहिलो.ते मोकळे व आपण घरात किंवा गाडीत !


पाश्चिमात्य देशांचा "गहू",पौर्वात्य देशांचा "तांदूळ" तसा आफ्रिकेचा "मका" ! पण जंगलात असून देखील आमचा मुक्काम मात्र स्टार हाॅटेल्स मधला ! त्यामुळे जेवणही पंचतारांकित ! त्यामुळे त्यातले आफिक्रन पदार्थ शोधून काढायला लागायचे ! त्यांचे टेबल देखील वेगळेच लावलेले असायचे ! काय नव्हते ते विचारा ! हत्ती,सिंह,गवा,गेंडा व चित्ता ही आफ्रिकेतील "पाच सुप्रसिध्द(Big Five) श्वापदे" सोडली तर बाकीच्या सर्व प्राण्यांच्या मांसाचा "आफ्रिकन डेलिकसी" म्हणून समावेश असायचा.


आपल्याला फिजीआलाॅजी शिकविणारे (वेडा)गोखले सर यांनी "Essential Amino Acids" शिकविताना "नरमांस" हे खाण्यासाठी सर्वात उत्कृष्ट मांस असे शिकविल्याचे आठवले व न घाबरता या "आफ्रिकन डेलिकसी" चा आस्वाद घेतला.जे आवडले त्याचे खाऊन झाल्यानंतर "गुपचुप" नाव वाचून यायचे या धोरणामुळेच हे शक्य झाले.

Recent Posts

See All
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page