top of page

खान्देश वासीयांचे कुलदैवत "कानबाई"

  • Aug 3, 2021
  • 3 min read

"खान्देश वासी जीभाऊंचे कुलदैवत "कानबाई" माता"


दीपक अंधारेने सर्व वर्गमित्रांना

https://youtu.be/auZs2lX4DkQ या संकेत स्थळावर खान्देश वासीयांचे कुलदैवत "कानबाई" मातेचे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी होणारे आगमन (कानबाई माता ऊनी ऊनी) पहाण्याचा आग्रह केला आहे.


भुलाबाई म्हणजे पार्वती,जगन्माता अदीपराशक्ति. भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भवनेश्वरी.या भूमीच्यासृजनशीलते चा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई. भूमी आणि परमप्रकृतिस्वरूपा पार्वती मातेचा सर्जनोत्सव.अस मानले जाते की पार्वती भिल्लीणिच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवासोबत माहेरी येते.माहेरच्या लोकांसोबत भेट घेते आणि सम्पूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्हासीत करते.मुलीच्या आगमनाने आई वडील आणि सगळे माहेरचे आनंदाने भारावरून जातात आणि याला एक उत्सवाप्रमाणे साजरा करतात. तिच्यासाठी विविध पक्वान्न आणि खेळ खेळले जातात. एका माहेरवाशिणीच्या आगमनासाठी म्हणून शिवशक्तीची ही पूजा. एक प्रकारचा "सुफलन विधी". भूलोबा हे सदाशिवशंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शिवशंकराची फक्त हजेरी असते.अगदी एका जावई प्रमाणे.भुलाबाई म्हणजेच परब्रह्मस्वरुपिणि देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना "भुलोबा" किंवा "भुलोजी राणा" म्हणतात. तर पार्वतीला "भुलाबाई" म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात. पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पुर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे.भाद्रपद पौर्णिमा (सहसा अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस) ते आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात.भोडनीचा सण,मातेचे गुणगान,हादगा आणि भोंडला हे पर्जन्योत्सव असून; "पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय', "भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी', "भुलाबाई राणीचे डोहाळे', "तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी', "चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू', "पाचाचा पाळणा, बाळ नेता हनुमंता, हनुमंताची निळी घोडी, येता जाता कंबळतोडी' अशी "मातृत्वा" बाबतची वर्णने गीतातून गाणाऱ्या भुलाबाई उत्सवाचा उद्देश मातृपूजा आणि मातृत्व गौरव असून भुलाबाईचा सोहळा हादगा आणि भोंडला ह्या पासून वेगळा असलेला एक सर्जनोत्सव आहे.अशा भुलाबाई गीतांच्या माध्यमातून आदिम समाजजीवनातील सुफळीकरणाचे रुढीअवशेष या उत्सवातून दिसून येतात.या "भुलाबाई गीतां" चा मी माझ्या समाजाला "थॅलेसेमियामुक्त समाज" करण्यासाठी कसा उपयोग करून घेतला ते सांगतो.


चैतन्य आणि मांगल्याचा बहर लेवून येणारा "शारदीय नवरात्र" महोत्सव माझ्या समाजात दरवर्षी गावोगावी साजरा केला जातो.मातेची नवीन मूर्ती घडविण्यात येते.

नवी वस्त्रे परिधान करण्यात येतात व वाजत गाजत मंदिरात नेण्यात येते.कुंभाराकडून नवीन चुल(रतन) आणण्यात येते व त्यावर कानबाई मातेचा दुध,भात व दही याचा नैवेद्य शिजवण्यासाठी विहीरीवरून वाद्यासह मिरवणूक काढून पाणी आणण्यात येते.रात्री मातेच्या गीत गायनाने जागर करण्यात येतो.धार्मिक परंपरेनुसार परिवारातील मुला-मुलीचे लग्न विवाह जमले की विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर "कानुबाई मातेचा थाट" हा उत्सव करण्याची परंपरा आहे.करोना काळात सर्व "अनाठायी खर्च" टाळून अत्यंत साध्या पद्धतीने फक्त कुटूंबियांच्या उपस्थितीत हा धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने प्रत्येक घरात कुलस्वामिनी, कानुबाई माता तसेच सर्व सोळा देवींची आराधना केली जाते.कुलस्वामिनींच्या अधिष्ठानातुन समाजाच्या प्रगतीला यशाचे अन् समृद्धिचे वरदान लाभते व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते.ही सर्वांचीच "धारणा" आहे.


माझ्या "वाणी" समाजाच्या "सोळा" कुलदेवता म्हणजे "सोळा" प्रकारच्या रंगसूत्रांचे(Chromosomes) संच असून त्यावर विविध प्रकारची जनुके(Genes) असतात.

या जनुकांमुळे त्या त्या व्यक्तीची शारिरीक जडण घडण ठरते.या पैकी काही जनुके सदोष असल्यास "थॅलेसेमिया" हा अनुवांशिक रक्त विकार उद्भवू शकतो.लाड सका (शाखीय) वाणी समाजात अशा व्यक्तींची संख्या सुमारे ५% असावी असे माझा या समाजाच्या इतिहासाचा अभ्यास सांगतो. त्यांनी परस्परांशी विवाह टाळल्यास लाड सका (शाखीय) वाणी समाज हा "थॅलेसेमियामुक्त समाज" होऊ शकतो.हा संदेश या महोत्सवात गीतांच्या माध्यमातून प्रसृत व्हावा यासाठी मी गेले काही वर्षे प्रयत्नात आहे. समस्त "कानुबाई भक्त परिवारा" ने माझे हे "समाज प्रबोधन" स्विकारलेले आहे.


लाड सका (शाखीय) वाणी समाजाला "थॅलेसेमियामुक्त" करण्याचा संकल्प या समाजातील समस्त धार्मिक, सामाजिक, राजकीय,सांकृतिक, शैक्षणिक इ. संघटनांनी सोडला असून "थॅलेसेमियामुक्त समाज" बनविण्याचे हे राष्ट्रीय व मानवतेचे कार्य हाती घेतले आहे.याचे मनस्वी समाधान आहे.





 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page