खेळ मांडला
- Aug 9, 2021
- 1 min read
"खेळ मांडला"
रायगड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.समीर साळुंखे,पोलादपूर व डॉ.शेखर दाभाडकर,महाड यांनी महापूरग्रस्त वैद्यकीय क्षेत्राच्या कथा आणि व्यथा मांडताना ही डाॅक्टर मंडळी यथाशक्ती व स्वबळावर आलेल्या आपत्तीवर मात करीत असल्याचे नमूद केले आहे.कोठेही आक्रंदन नाही.याउलट जनकल्याण रक्तपेढीचे नुकसान अधोरेखित करून लवकर पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असेच ही डाॅक्टर मंडळी सांगत आहेत व आपली संस्कृती जपत आहेत.
काय म्हणतात कोकणातील डाॅक्टर मंडळी जनकल्याण रक्तपेढी,महाड बद्दल ? स्वत:चे दु:ख बाजूला ठेऊन ते काय आवाहन करत आहेत ते ऐका :-
जनकल्याण रक्तपेढी,महाड हे एक सामाजिक सौहार्दाचे मूर्तिमंत रूप.कोकणातील सेवा कार्यात अग्रणी असलेल्या या रक्तपेढीच्या जनरेटर, रक्तपेढी संकलन वाहन, रक्तसाठा, अत्यंत केमिकल्स व इतर कमोडिटी यांचे अक्षम्य नुकसान या महापुराने केले.नुकतेच सुरू केलेले ब्लड कांपोनंट सेपरेशन युनिट व त्याकरिता अगदी नव्याने संग्रहित केलेली अद्ययावत उपकरणे, मशिन्स धोक्यात आली आहे. ही सेवा लवकरात लवकर पूर्वपदावर येऊन संपूर्ण कोकणवासीयांच्या मदतीला सक्षम करणे अत्यावश्यक झाले आहे.
समस्त कोकणवासीयांचे आदराचे स्थान असलेली जनकल्याण रक्तपेढी,महाड "फिनिक्स" पक्षाप्रमाणे गरूडभरारी घेतल्या शिवाय रहाणार नाही.
Comments