top of page

गुरूपौर्णिमा

  • dileepbw
  • Aug 11, 2021
  • 2 min read

आज गुरूपौर्णिमा ! आपल्या सर्व ब्रम्हस्वरुप गुरूजनांना वंदन असो ! माझे पॅथाॅलाॅजी विषयातले गुरू म्हणजे मा.डाॅ.आर.व्ही.आगरवाल सर ! ते पुण्यात असे पर्यंत दर

गुरूपौर्णिमेला मी त्यांना शाल,श्रीफळ व पेढ्याचा पुडा घेऊन आशिर्वाद घ्यायला जात असे.याचे आगरवाल मॅडमना फार कौतुक असे.कधी कधी पद्मजा आगाशे (कानिटकर) पण माझ्या बरोबर यायची. आता सर अमेरिकेत असल्याने सरांची भेट होत नाही.त्यांना येथूनच नमन करतो.


आगरवाल सरांनी मला पॅथाॅलाॅजी विषय शिकवला खरा ! पण पॅथाॅलाॅजी हा उत्तम व्यवसाय म्हणून कसा करावा हे अनेकांनी शिकवले.त्यातले माझे व्यावसायिक गुरू म्हणजे कै.डाॅ.मनोहर घारपुरे ! त्यांचे त्वचारोगतज्ञ बंधू डॉ.मोहन घारपुरे यांनी देखील मला खूप काही व्यावहारिक ज्ञान दिले. डॉ.मोहन घारपुरे OPD सुरू व्हायच्या आधी तासभर लायब्ररीत जाऊन वाचन करायचे.काल प्रसिध्द झालेले जर्नल घारपुरे सरांनी दुसर्‍या दिवशी वाचलेले असायचे. त्यांच्या "मर्सिडीज" ने घातला नाही एवढा मोठा "पिंगा" त्यांच्या गळ्यातील "कॅमेर्‍या" ने माझ्या मनात घातला आहे.


एक लेप्रसी व दुसरे स्कीन ट्युमर्स सोडले पर आम्हाला डर्म्याटाॅलाॅजीतले काहीही येत नव्हते.कार्यानुभव नसेल तर आपण सगळेच "मोठे शून्य" आहोत ते या विभागाने मला शिकवले. "टी.टी.लेप्रसी" तर बरेच वेळा आम्हाला स्लाईडमधे काहीही दिसत नाही.पण या त्वचारोगतज्ञांना लेप्रसी मधे नर्व्ह खराब झाल्यामुळे पडलेला अंधार "लख्ख प्रकाशा" सारखा दिसत असतो.वायरिंग तुटलेल्या बल्ब सारखेच हे आहे.डर्म्याटाॅलाॅजीस्टला "लख्ख अंधार" तर दिसतो आहे पण वायर कुठे तुटली आहे ते मात्र पॅथाॅलाॅजिस्टला बर्‍याचदा दिसत नाही.त्यामुळे मी रिपोर्ट देताना "Please correlate clinically" असा बचामात्वक पवित्रा घ्यायचो.ते डॉ.मोहन घारपुरे सरांना अजिबात आवडत नसे.टिश्यू संपे पर्यंत व ग्रॅन्युलोमा दिसे पर्यंत स्लाईड्स बनवत रहा.असे सांगायचे.शेवटी मी 'Histological findings are consistent with clinical diagnosis of Hansen's disease" असे लिहायला सुरूवात केली.त्यामुळे घारपुरे सर खुश झाले. पण पुण्यातल्या पॅथाॅलाॅजिस्ट मंडळींनी मात्र माझ्या लॅबला "इच्छापूर्ती लॅब" असे खोचक नाव बहाल केले."राखावी अंतरे बहुतांची" असा माझा स्वभाव असल्याने मी या पॅथाॅलाॅजिस्ट मंडळींना म्हणायचो - अरे आपण पेशंट पहात नाही. स्कीनचा "झाxxभर" तुकडा पहातो.त्यात Granuloma दिसला नाही तर तो "Hansen's disease" नाही का ? माझा माझ्या गुरूंच्या Clinical judgement वर पूर्ण विश्वास आहे.अशावेळी त्यांना मी मुकेशचे एक गाणे अपभ्रंशित करून गप्प करायचो :-


जो तुझको हैं पसंत वही बात करेंगे

"शिशे" के ये "फ्लास्क" को हम "जार" कहेंगे ।।


आता आपण अनेकांचे "गुरू" झालेले आहोत.आपल्या शिष्यांना आपण भरभरून दिले पाहिजे.या बाबतची माझी एक आठवण सांगतो.मी गेली अनेक वर्षे वालावलकर रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय,डेरवण,चिपळूण येथे रक्तपेढी विज्ञानाचा गुरू म्हणून विनामूल्य ज्ञानदान करायला जातो आहे.दर गुरूपौर्णिमेला या संस्थेकडून येणारी वस्तूरूप "गुरूदक्षिणा" साक्षात "स्वामी समर्थांचा आशिर्वाद" म्हणून स्विकारताना खरोखर "गुरू" झाल्यासारखे वाटते व या जन्मीचे सार्थक झाल्याचा आनंद प्राप्त होतो.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page