गानकोकिळेचे थाळनेर
- dileepbw
- Nov 8, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या "धुळे" शहराचा अभ्यास करताना सापडलेल्या काही गोष्टी मी आपल्या सर्वांच्या अवलोकनार्थ खाली देत आहे:-
१. लाड सका(शाखीय) वाणी समाजातील अनेक "कुलानामे" ही धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील छोट्या छोट्या खेड्यांची(कुलग्रामे) नावे असल्याचे आढळून येते.
२. लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा इतिहास लिहिताना या कुलग्रामांच्या इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
३. प्रत्येक समाज बांधवाने आपआपल्या कुलाचा इतिहास शोधून काढल्यास हे काम सोपे होणार आहे.
४. हा कुलग्रामांचा इतिहास शोधताना अनेक ऐतिहासिक,सामाजिक,भौगोलिक व काही मनोरंजक माहिती देखील उजेडात येते.
याची काही उदाहरणे पहा:-
१. लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या "धुळे" शहरातील, तापी नदीच्या तीरावर वसलेले,शिरपूर तालुक्यातील "थळनेर"(पिन कोड - ४२५४१२)हे गाव लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे तत्कालीन वास्तव्य असलेल्या, संपूर्ण खानदेश प्रांतावर राज्य केलेल्या, "फारुकी" या मुस्लिम राजवटीचे राजधानीचे गाव होते.
२. या गावाचे "थळनेर" हे नाव तेथील "थळेश्वर" या प्राचीन मंदिरावरून पडलेले आहे. त्यामुळे "थळेश्वर" या प्राचीन मंदिराचा इतिहास अभ्यासल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा इतिहास समजण्यास उपयोग होणार आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या "धुळे" शहराचा अभ्यास करताना सापडलेल्या काही गोष्टी मी आपल्या सर्वांच्या अवलोकनार्थ खाली देत आहे:-
३. आता "थळनेर" ची माहिती घेत असताना लक्षात आलेली ही मनोरंजक,चित्तवेधक व आपल्याला गौरवशाली वाटेल अशी गोष्ट पहा.
स्वर्गीय आवाजाची देणगी प्राप्त झालेल्या मा.श्रीमती लतादीदी मंगेशकर कोणास माहित नाहीत ?
पण त्यांची आई "शेवंताबाई उर्फ शुद्धमती" या "थळनेर" चे प्रसिद्ध व्यापारी, "लाड वाणी" समाजाचे समाजबांधव, शेठ श्री.हरिदास रामदास लाड यांची सुकन्या हे किती जणांना माहित आहे ?
"शेवंताबाई उर्फ शुद्धमती उर्फ माई मंगेशकर" या "लाड वाणी" महिलेने एकाहून एक सरस (लतादीदी, आशादीदी,मीनादीदी, उषादीदी व हृदयनाथ) अशी "स्वररत्ने" संपूर्ण जगाला दिली याचा सर्व समाज बांधवांना अभिमान वाटेल याची मला खात्री आहे.
४. मनाला आनंद देणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या कुलाचा शेध घेताना गवसतील.
मग लागणार ना अभ्यासाला ?




Comments