top of page

चिपळुणच्या डोक्यावर घोंघवणारे नवे वादळ.

  • Jan 3, 2022
  • 3 min read

चिपळुणच्या डोक्यावर घोंघवणारे नवे वादळ.


चिपळुण एक काळी खास मराठी बाणा असलेल गाव. कोकणातील इतर गावांच्या संस्कृतीपेक्षा चिपळुणची संस्कृती जरा वेगळीच. पुर्वी व्यापार उदीम जास्त करुन वाणी व ब्राह्मण समाजाच्या हाती होता. मोजकी मारवाडी कुटुंब होती, तसेच पिढ्यान पिढ्या स्थायीक झालेला पटेल समाज व काही व्यापार मुस्लिम समाजाकडे होता. सगळ्या धर्मीयांमध्ये, जातीपातींमध्ये एकोप्याचे संबंध. सगळ्याच धर्मीयांचे पारंपारीक सण जोरात साजरे व्हायचे. द्वेषभावना नव्हती. सामाजिक एकोपा होता. कट थ्रोट कॉम्पीटेशन किंवा ग्राहकांना लुटायच असा ही प्रकार नव्हता. सगळ कस सुशागत चालु होत.

चिपळुणच औद्योगीकरण कोयना धरण बांधकामापासुन सुरु झाल. कोयना धरणाच बांधकाम, एकामागोमाग एक उभे राहिलेले जलविद्युत प्रकल्प त्यामुळे चिपळुण देशाच्या औद्योगीक नकाशावर आल. हुशार, मेहनती, हस्त कौशल्य असलेल्या तरुणांची चिपळुणमध्ये कमतरता नव्हती. अनेक जण या प्रकल्पांमध्ये नोकरीला लागले, अनेकांनी या प्रकल्पांना पुरक असे लघु उद्योग सुरु केले. हार्डवेयरची दुकान आली, सिमेंटच्या एजन्सीज आल्या. वाहतुक व्यवसाय वाढला. मग चिपळुणच्या २० किलोमिटर परिघात एक नाही तर तीन एम आय डी सी वसल्या. गणे खडपोली, खेर्डी आणी लोटे परशुराम एम आय डी सी. मग कोकण रेल्वे आली, एनरॉन प्रकल्प आला. या सगळ्या उत्क्रांतीत चिपळुण आपल मुळस्वरुप बर्‍या पैकी टिकवुन होत.


अगदी मार्च २०२० पर्यंत सगळ सुरळीत होत.


मार्च २०२० मध्ये लॉकडावुन जाहीर झाला. लॉकडावुन लांबत लांबत गेला. त्यात अनेक मराठमोळे व्यापारी उध्वस्त झाले. आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या ते खचले. आपली उमेद, आपली हिम्मत हरवुन बसले. अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. आपल्या जागा परराज्यातुन आलेल्या अरबी देशातील पैश्याच पाठबळ असलेल्या लोकांना एक तर भाड्‍याने दिल्या अथवा विकुन टाकल्या. अनेक दुकानांवर के जी एन (खुदा गरीब नवाझ) चे बोर्ड लागले.

राज्या बाहेरुन आलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी एक गठ्ठा दुकान, व्यापार उदिम ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आज मुख्य बाजारपेठेतील शंभरच्यावर मुळ व्यापार्‍यांची दुकानांचे लॉकडावुन नंतर हस्तांतरण झाले. या हस्तांतरणाचा चिपळुणच्या संस्कृतीवरच मोठा घाला बसण्याची शक्यता निर्माण झाली.

हे सगळ कमी होत अस म्हणायची वेळ २२ जुलैच्या महापुराने आणली.

अख्खी बाजारपेठ पाण्या खाली गेली. कोट्यावधी रुपयाचा माल पाण्यातुन वाहुन गेला किंवा चिखलाने बरबाद झाला. चिपळुणच्या मराठ मोळ्या व्यावसायिकांना हा धक्का पचविण खुप कठीण आहे हे स्पष्ट झालय. राज्य सरकारने जी मदत पुढे केलीय ती दुकान साफ़ करण्यातच खर्ची पडणार आहे. या मराठी व्यापार्‍यांना खेळते भांडवल उभ करण अशक्यप्राय होणार आहे.

याचा दुरगामी परिणाम लक्षात येतोय?

हे उरले सुरले मराठी व्यापारी आपली दुकान बंद करुन वर उल्लेखलेल्या परराज्यातुन आलेल्या व त्यांच्या समाजाच जबरदस्त पैश्याच आर्थीक पाठबळ असलेल्या परधर्मीय व्यापार्‍यांना अलगद हस्तांतरीत करणार. चिपळुण मधील व्यापार्‍यांमधील मराठी टक्का झटकन खालती येणार.


याचे दुरगामी परिणाम लक्षात येतात मित्रांनो?


जुन एकोप्याच वातावरण टिकुन राहण कठीण वाटत आहे. अशी भिती वाटते ज्या बाजारपेठेतुन वाजत गाजत भैरीची पालखी जायची त्या पालखीला आज नाही पण आगामी काही वर्षात धार्मिक तेढ निर्माण होवु नये म्हणुन बंदी येवु शकते. रस्ते शुक्रवारचे रस्त्यावरील नमाज पठणासाठी बंद होवु शकतात.


चिपळुणच्या संस्कृतीवर हे नव वादळ घोंघावतेय.


ते आपण थोपवु शकतो.

त्यासाठी आज महाराष्ट्रातील इतर शहरांधील मराठी हिंदु व्यापार्‍यांनी चिपळुणच्या मराठी व्यापार्‍यांना मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांना या कठीण समयी पाठबळ दिल पाहिजे. "इतरांना" मदतीचा हात ऑलरेडी मिळाला आहे. त्या लोकांना रोख स्वरुपात व दुकानात विक्री साठी ठेवायच्या मालाच्या स्वरुपात त्यांच्या समाजाकडुन मदतीचा हात मिळाला आहे.

एकटा पडला आहे तो चिपळुण मधील मराठी हिंदु व्यापारी.

हिच वेळ आहे त्याला सावरायची. आज त्याला चिपळुण बाहेरील नैसर्गिक संकटाची झळ न बसलेल्या व्यापार्‍यांनी मदत नाही केली तर चिपळुण मधील व्यापार काही महिन्यातच मराठी हिंदु व्यापार्‍याच्या हातुन कायमचा जाईल. चिपळुणच मुळ स्वरुप नष्ट होवुन एक भयावह परिस्थिती बघायला मिळेल. कोकणातल एक सुसंकृत गाव बकाल झालेल बघायला मिळेल. कोकणचा पश्चिम बंगाल होण्याची ती सुरुवात असेल.


मित्रांनो या धोक्याची जाणीव समजुन घ्या. आपल्या मित्रांमध्ये शेयर करा.


कोकणच्या संस्कृतीला धोका निर्माण झाल्याचा भोंगा वाजला आहे.


रात्र वैर्‍याची आहे. जागे व्हा, जागे रहा.


चिपळुणवर नव्हे कोकणावर घोंघावणार हे वादळ खुप विनाशकारी ठरु शकत.


कोकण कॅलिफ़ोर्निया व्हायच राहिल दुर, काबुल मात्र नक्की होवु शकत.


परिस्थितीच गांभिर्य प्लीज लक्षात घ्या.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page