जनकल्याण रक्तपेढी,महाडचे अलौकिक कार्य
- dileepbw
- Aug 4, 2021
- 1 min read
जनकल्याण रक्तपेढी,महाडचे अलौकिक कार्य व त्यांची जनमानसातील प्रतिमा"
जनकल्याण रक्तपेढी,महाड या संपूर्ण कोकणासाठी रक्तसेवा देण्यात अग्रेसर असलेल्या सेवाभावी रक्तपेढीची जनमानसातील प्रतिमा अतिशय असामान्य आहे याची प्रचिती काल आली.अंधारलेल्या काळ्याकुट्ट मेघाला जशी "चंदेरी किनार" असावी तशी दुसर्या मजल्यावरची महाडकरांच्या प्रेमाची व विश्वासाची प्रतिक असलेली ७५ लाख रूपयांची Blood Component Laboratory ची उपकरणे निसर्गाच्या कोपातून सुरक्षित राहिल्याचे पाहून समाधान वाटले व पुन्हा "गरूडझेप" घेण्याचा उत्साह संचारला.
जनकल्याण रक्तपेढी,महाड या संस्थेवरील महाडकरांच्या प्रेमाचे व विश्वासाचे प्रतिक असलेले एक ऐतिहासिक स्थान पहायला मिळाले."पत्त्याचा बंगला" कोसळावा त्याप्रमाणे क्षणात जमीनदोस्त झालेली महाडमधील पाच मजली इमारत ! त्याक्षणी नुसत्या मोबाईलवरील एका हाके सरशी ६५ रक्तदात्यांनी मध्यरात्री रक्तपेढीमधे रक्तदानासाठी धाव घेतली."बी निगेटिव्ह" हा दुर्मिळ रक्तगट असलेल्या आपत्तीग्रस्ताचे प्राण वाचले.महाराष्ट्र शासनाने देखील "जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या या अलौकिक कार्याचा गौरव केला.
"जनकल्याण रक्तपेढी,महाडवर असे दिव्य प्रेम करणारे
महाडकरच सध्या आपत्तीग्रस्त असल्याने आपण सर्वांनी लांबूनच त्यांचे पहाण्यापेक्षा व ऐकण्यापेक्षा त्यांना आपल्या आर्थिक मदतीचा हात पोहचवू या !




Comments