top of page

जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुनर्वसन

  • Aug 20, 2021
  • 1 min read

"जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुनर्वसन"


सर्वांना कळविण्यास आनंद होतो की महापूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे "शक्तीकेंद्र" आज पुन:प्रस्थापित झाले.मुंबईच्या एका स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या रू.पाच लाखाच्या मदतीमुळे हा 30 KVA Capacity चा "जनरेटर" आज कार्यान्वित झाला आहे.या "जनरेटर" च्या रूपाने रक्तपेढीला आपला "Mitochondria" प्राप्त झाला असून आता आवश्यकता आहे ती "Locomotor Organ" ची म्हणजे "रक्त संकलनासाठी आवश्यक असलेल्या वाहनाची ! त्यासाठी सुमारे ३५ लाख रूपयांची आवश्यकता आहे.सध्या जनकल्याण रक्तपेढी,पुणे या संस्थेने आपली गैरसोय सहन करून आपले वाहन जनकल्याण रक्तपेढी,महाड या संस्थेला काही काळासाठी वापरायला दिलेले असल्याने सध्यातरी रक्त संकलन थांबलेले नाही.


सध्या अडचण आहे ती महापूर पश्चात उद्भवलेल्या डेंगी, मलेरिया व लेप्टोस्पायरा यांच्या साथीची व त्यामुळे वाढलेल्या "प्लेटलेट्स" च्या मागणीची ! त्यातच समस्त महाडकरांचे धनुर्वातासाठी व्यापक लसीकरण झालेले असल्याने ते सध्या काही काळ "रक्तदान" करू शकणार नाहीत.त्यामुळे बाहेरगावी रक्तदान शिबिरे घेण्याला पर्याय नाही.पंधरा आगस्टच्या राष्ट्रीय मुहूर्तावर मंडणगड व खेड येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमधून जमा झालेले शंभर युनिट रक्त दोन दिवसातच संपले आहे.त्यामुळे सातत्याने बाहेरगावी रक्तदान शिबिरे घेण्याला पर्याय राहिलेला नाही.त्यासाठी वाहन आवश्यक !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page