जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुन:प्रस्थापन
- Aug 6, 2021
- 1 min read
"जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुन:प्रस्थापन"
दि.१४ मे,२०२१ रोजी "अक्षयतृतीया" च्या शुभमुहूर्तावर
जनकल्याण रक्तपेढी,महाडची Blood Component Laboratory सुरू झाली आणि संपूर्ण कोकणातून या सेवेला अभूतचपूर्व प्रतिसाद मिळाला.प्रचार,प्रसार व प्रशिक्षण या तीन सूत्रांमुळे केवळ दोन महिन्यातच "फ्रेश ब्लड" व "व्होल ब्लड" यांचा वापर कोकणात बंद झाला असून सर्वांकडून योग्य त्या रक्त घटकाची मागणी केली जात आहे.त्यामुळे जनकल्याण रक्तपेढी,महाडची रक्त घटकांची निर्मिती व साठवणूक क्षमता लगेच दुप्पट करण्याची वेळ आलेलीच होती.त्यामुळे महापूर ही "आपत्ती" न मानता सर्वांनी "इष्टापत्ती" मानावी असे सांत्वन करून आलेलो आहे.
रक्त घटकांची निर्मिती व साठवणूक क्षमता दुप्पट करण्यासाठी काय करावे लागेल ? आहे त्या उपकरणांची संख्या दुप्पट करणे. आपत्तीच्या काळात प्रत्येक उपकरणाला एक "stand by" असणे कधीही चांगले. रक्तपेढीला "अव्याहत सेवा" द्यायची असल्याने ते आवश्यक देखील आहे.अशी "stand by" यंत्रणा उपलब्ध असणे हे रक्तपेढीच्या मानांकनासाठी(Accreditation) देखील गरजेचे आहे.
त्यामुळे समस्त महाडकरांनी जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुन:प्रस्थापन करताना या बाबींचा अवश्य विचार करावा व देणगीदारांना आवाहन करताना तशी कल्पना द्यावी. त्यासाठी या उपकरणांच्या सद्य किमतीची संभाव्य देणगीदारांना अवश्य कल्पना देवून ठेवावी.हे विनम्र आवाहन.
Comments