top of page

जनकल्याण रक्तपेढी,महाड साठी आर्थिक मदतीचे आवाहन

  • Aug 2, 2021
  • 2 min read

"जनकल्याण रक्तपेढी,महाड साठी आर्थिक मदतीचे आवाहन"


नमस्कार मित्रांनो,


अत्यंत दु:खी अंत:करणाने व साश्रू नयनांनी आपल्या सर्वांना नैतिक आधाराचे व आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहे.


जनकल्याण रक्तपेढी परिवाराची संपूर्ण कोकणाला रक्तसेवा पुरविणारी "महाड" येथील जनकल्याण रक्तपेढी दि.२२ जुलै,२०२१ पासून १७ फुट पाण्याखाली बुडालेली असून गेल्या काही दिवसांपूर्वीच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर नव्याने सुरू झालेली Blood Component Laboratory देखील नुकसान झालेले आहे.सुदैवाने प्राणहानी झालेली नाही.


आता पाणी ओसरले असून अंधार,अस्वच्छता व अनारोग्य दूर करण्याचे प्रयत्न कसोशीने सुरू आहेत.जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या स्वच्छतेचे काम काल पूर्ण झाले असून मुंबईच्या एका स्वयंसेवी संस्थेने ३० KVA क्षमतेचे जनरेटर

एक महिना वापरण्यासाठी "विनामूल्य" पाठवल्याने व MSEB चा वीजपुरवठा कमी दाबाने व अंशत: सुरू झाल्याने आज पासून सर्व उपकरणे क्रमाक्रमाने तपासून पहाता येतील व झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता येईल.

तो जसाजसा हाती येईल तसे तसे क्रमाने सर्वांना कळवेनच.


गेले आठ दिवस सर्व रसायने व साधारण ३१० युनीट FFP व १०० युनिट PRC आवश्यक तापमानाला नसल्याने वाया गेलेली आहेत.रक्त संकलनासाठी वापरली जाणारी ब्लड कलेक्शन व्हॅन नष्ट झाल्यात जमा आहे.त्यामुळे या पुढील रक्त संकलन फक्त रक्तपेढीतच करता येणे शक्य आहे. ती व्यवस्था मात्र सुरू झाली आहे.रक्त वितरण सुरु होण्यासाठी मात्र अजून काही दिवस लागतील.


जनकल्याण रक्तपेढी परिवार हा लोकांचा,लोकांनी, लोकांसाठी चालविलेला मानवतेचा वैद्यकीय सामाजिक उपक्रम असून त्याचे "भरण-पोषण" समाजालाच करावे लागणार आहे.आपण सर्वजण या समाजाचेच एक घटक आहात.त्यामुळे ही "सामाजिक जबाबदारी" उचण्यात आपण ही आपला "खारीचा वाटा" द्यावा.हे विनम्र आवाहन !


तातडीची मदत म्हणून जनकल्याण रक्तपेढी परिवारातर्फे रू.अडीच लाखाची मदत पाठविण्यात आली असून पुणे शाखेने ब्लड कलेक्शन व्हॅन व अकोला शाखेने दोन रेफ्रिजरेटर्स पाठविण्याची तयारी दर्शविलेली आहे.अन्य शाखांनी देखील असाच विचार करावा.हे विनम्र आवाहन !

ज्यांना आर्थिक मदतीचा हात देणे शक्य आहे त्यांच्यापर्यंत जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या बँक खात्याची माहिती व आर्थिक मदतीचे आवाहन पोहोचवावे.


१.नाव - कै.काकासाहेब चितळे स्मृती केंद्र

२.सेव्हिंग खाते क्र. १२१५१०१००००७७०१

३.IFSC Code - BKID0001215

४.बँक - बँक आॅफ इंडिया,महाड शाखा


आपल्या "फुल ना फुलाची पाकळी" ची अपेक्षा आहे. धन्यवाद !



 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page