जाती-धर्मांपलिकडे जावून मनामनात मानवतेची बीजे पेरु शकणारी रक्तसेवा
- dileepbw
- Aug 20, 2021
- 1 min read
"जाती-धर्मांपलिकडे जावून मनामनात मानवतेची बीजे पेरु शकणारी रक्तसेवा"
दत्तू दरंदळेच्या "अफगाणीस्तानातील धर्मयुद्धाने आई-बाप-भावंडे-सर्व सर्व गमावलेल्या बालकांच्या आक्रोशाने तुमचंही काळीज फाटत नाही काय?" या लेखाने "रक्तसेवा" या सर्व जाती-धर्मांपलिकडे जावून मनामनात मानवतेची बीजे पेरु शकणार्या मानवतेच्या सेवेचे महत्व अधोरेखीत होते.
"रक्तसेवा" ही एकच सेवा धर्मांधता नाकारून सर्वांच्या मनामनात मानवतेची बीजे पेरणारी सेवा आहे.आपल्या सभोवताली दिसणारे अनेक "आक्रोश" थांबवू शकणारी अशी ही "रक्तसेवा" आहे.
आपण आपल्या सभोवताली होऊ पहाणारी देव-धर्माच्या रक्षणासाठीची "धर्मयुद्धे" थांबवू शकणार नाही काय?
धर्मयुद्धात श्वापदे होवून माणूसकीचे लचके तोडणार्या सर्वच धर्मांच्या अतिरेकी धर्मयोद्ध्यांना आपण रोखू शकणार नाही काय? चला! सार्याच धर्मवेड्या भूलभूलय्यांना नाकारु या! माणसाचे माणसाशी माणूसकीचे नाते जोडूया!
जोडणार ना? निसर्गाच्या कोपाने जनकल्याण रक्तपेढी, महाड या संपूर्ण कोकणाला "रक्तसेवा" पुरविणार्या सेवाभावी संस्थेला आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. करणार ना मदत ?




Comments