top of page

डाॅ.राधाकृष्ण ठुबे

  • Dec 14, 2021
  • 1 min read

आज आपला वर्गमित्र कान्हूर पाठारचा GP डाॅ.राधाकृष्ण ठुबे याचा वाढदिवस ! आपल्या सर्वांतर्फे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


अत्यंत खडतर आर्थिक परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या राधाकृष्णने तीसगाव व नगरला इंटर्नशीप पूर्ण करून पुढे एक वर्ष प्रवरानगरला व्यावसायीक अनुभव घेतला व गेली सलग चाळीस वर्ष कान्हूर पाठारवासीयांच्या चरणी आपली वैद्यकीय सेवा रूजू केली.बालपणी आईच्या पोटात असतानाच सुईण झालेल्या मामीच्या मुलीशीच विवाहबध्द झालेल्या राधाकृष्णला त्याच्या सारखाच कर्तृत्ववान चिरंजीव असून तो नागपुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात Forensic Medicine चा व्याख्याता म्हणून केंद्र शासनाच्या सेवेत कार्यरत आहे. कन्या पुण्याला बरोडा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असून तीर्थरूपांचे नाव उज्वल करीत आहे.


मेंढी सारखे कुरळे केस असलेल्या डाॅ.राधाकृष्णचे सर्व केस अजूनही जसेच्या तसे शाबूत आहेत.त्याला असेच दीर्घ आरोग्य लाभो.हीच प्रभुचरणी प्रार्थना ! त्याचे केस पहायला सर्वांना आवडेल.आजचा औक्षणाचा फोटो जरूर टाकावा !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page