डॉ.सायरस पूनावाला
- dileepbw
- Jan 26, 2022
- 2 min read
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने यंदाच्या वर्षी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांची "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा" साठी निवड करण्यात आली आहे.त्यांचे आपल्या सर्वांतर्फे मन:पूर्वक अभिनंदन !
येत्या १३ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.पूनावाला समूहाच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोव्हीशील्ड लशीची निर्मिती करून भारतासह जगभरातील कोट्यावधी नागरिकांना कोरोनापासून संरक्षित केले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सिरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती राहणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सकाळी १०.३० वाजता हा सोहळा होईल.
या निमित्ताने डॉ.सायरस पूनावाला यांचा अल्पपरिचय सादर करतो व माझे व त्यांचे रुणानुबंध कसे निर्माण झाले याची थोडक्यात माहिती देतो.
इ.स.१९४१ साली जन्मलेले डॉ.सायरस पूनावाला हे "Forbes' India" या संस्थेतर्फे केल्या जाणार्या सर्वेक्षणा नुसार भारतातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती ! १९८३ साली स्थापन झालेल्या जनकल्याण रक्तपेढी,पुणे या संस्थेत हजारो स्वयंसेवक "स्वेच्छा रक्तदान" करतात या गोष्टीचे डॉ.सायरस पूनावाला यांना खूपच "अप्रूप" होते. कारण १९६६ साली स्थापन करण्यात आलेल्या Serum Institute of India या संस्थेत Inj.Anti-D ची निर्मिती करण्यासाठी त्यांनी डझनावरी Rh Negative धंदेवाईक रक्तदाते मोठ्या मानधनावर पाळलेले होते.त्यांची एक वसाहतच त्यांनी निर्माण केलेली होती.त्यासाठी त्यांनी IBM कंपनीचे भारतातील पहिले "Apheresis Machine" खरेदी केलेले होते.ती प्रक्रिया पहाण्याची संधी त्यांनी मला मिळवून दिली होती.आपल्याला एक वर्ष ज्येष्ठ असलेला डाॅ.राऊत हा त्यावेळी या "Apheresis "Laboratory" चा प्रमुख होता.त्याच्या मुळे त्याचे वरीष्ठ डाॅ.जाधव व डाॅ.कापरे हे संचालक माझ्या परीचयाचे झाले. त्यामुळे Serum Institute of India च्या सर्व अभ्यासवर्गांची तसेच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची आमंत्रणे मला येऊ लागली.मला ही व्याख्याता म्हणून आमंत्रित केले जाऊ लागले.पुढे जनकल्याण रक्तपेढी,पुणे या संस्थेचे संस्थापक कै.वै.प.य.वैद्य(खडीवाले) यांचे जावई डाॅ.राजीव ढेरे
Serum Institute of India या संस्थेत संशोधक म्हणून रूजू झाले. त्यांनी तेथे measles लसीचे उत्पादन सुरू केले.आज तेथे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत व नुकतेच जनकल्याण रक्तपेढी,पुणे या संस्थेचे "विश्वस्त" म्हणून कार्यरत झालेले आहेत.डॉ.सायरस पूनावाला यांना "पद्मश्री" व "Entrepreneur of the Year" व Honorary doctorate by The University of Massachusetts Medical School","Honorary doctorate by the University of Oxford"
हे पुरस्कार प्राप्त होण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
डॉ.सायरस पूनावाला यांच्या दातृत्वाचा लाभ घेण्याची संधी १९८८ साली मी आपल्या बी.जे.मेडीकल काॅलेजमधे आयोजित केलेल्या राष्ट्रीय रक्तपेढी विज्ञान परीषदेच्या वेळी आली होती.पण पुरेसे निधी संकलन करू शकल्यामुळे त्याचा लाभ घेतला नाही.पण "युक्रेन" सारख्या देशाने मात्र डाॅ.राजीव ढेरे निर्मीत मिसल्स लसीचे १०० कोट डोसेस देणगीस्वरूपात प्राप्त करून घेतले.अशा या दातृत्ववान
डॉ.सायरस पूनावाला यांना त्रिवार अभिवादन !




Comments