तालिबान चा उदय ! धोक्याची घंटा !
- dileepbw
- Aug 17, 2021
- 6 min read
"तालिबान चा उदय ! धोक्याची घंटा !"
आजच श्री.रवींद्र मुळे,नगर यांचा "तालिबान चा उदय ! धोक्याची घंटा !" हा लेख वाचला व मन सुन्न झाले.
गेले कित्येक दिवसाचे अफगाण मधील चालू असलेले
नाट्य संपले आणि आज काबुल चा ताबा अखेर तालिबान्यांनी घेतला.हे लिहत असे पर्यंत सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असेल . हत्ती नाही, घोडा नाही , वाघाचे तर नाव नको ! गरीब बिचारा बोकड मेला , दुबळा तू कधी राहू नको ! असे म्हंटले जाते ते सत्यात उतरताना अफगाण च्या घडामोडीवरून दिसत आहे .
अफगाणिस्तान अमेरिकेच्या भरवशावर होते पण शेवटी
" जो दुसऱ्यावर विसम्बला त्याचा कार्यभाग बुडाला !" हे पुन्हा सिद्ध झाले . ट्रम्प गेले बायडन आले त्यांनी सैन्य काढून घेतले आणि लगेच सगळे आटोपले . अमेरिकन सैन्य हे अफगाण सेनेला प्रशिक्षण देण्यासाठी थांबले होते असे म्हणतात . पण त्या प्रशिक्षणाचा काय फज्जा उडाला तो सारे जग बघत आहे .
मुळात अमेरिकेला फार प्रेम होते म्हणून ते तालिबान ला विरोध करत नव्हते आणि रशिया पण फार प्रेमाने तालिबानला मदत करत नव्हते तर हा दोन महाशक्तींच्या
सराव युद्धाचा प्रकार होता त्यात बिचारे अफगाण हे होरपळून गेले .
मानवी मूल्ये , जागतिक शांतता , महिलांचा सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टी ही सगळी या देशांची तोंडी लावण्याचे पदार्थ आहेत . या सर्व शक्तिशाली देशांना करायचा आहे शस्त्रांचा व्यापार ! " बळी तो कान पिळी " हा सर्वत्र न्याय आहे ! यात भरडले जात आहेत दुबळे राष्ट्र आणि त्यांची भाबडी जनता !
या सर्व खेळासाठी सीमेटिक विचारसरणी या मंडळींना
पूरक आहे आणि त्या मुळे अमेरिका असो , चीन असो किंवा रशिया याना मुस्लिम धर्मवेडे पण हे त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी फायद्याचेच आहे .त्यामुळे वेळ प्रसंगी कधी पाकिस्तान , कधी अफगाणिस्तान तर कधी इराण , इराक कधी पलेस्टिन याना आळी पाळीने प्रोत्साहन देत दहशतवाद खरे तर यांनी पोसला आहे . ( अर्थात आपल्या देशात ही प्रवृत्ती वाढणार नाही याची पुरेशी काळजी हे हुशार देश घेतात )
इस्राएल सारखा देश स्वतःच्या शक्तीवर उभा राहिला सुरुवातीला जरूर अमेरिकेने त्यांना राजकीय पाठिंबा दिला पण नंतर इस्राएल ने स्वतः ला संरक्षण सिद्ध केले .
तालिबानी ही एक प्रवृत्ती आहे . माणसांना मध्ययुगीन वातावरणात नेणारी ही अपप्रवृत्ती आहे . धार्मिक आणि श्रद्धेच्या बाबतीत असहिष्णू कसे असावे याचा नमुना म्हणजे तालिबानी वृत्ती ! ९२ ते ९६ काळात यांनी बौद्ध पुतळ्यांचे काय केले, हा इतिहास जुना नाही ! तालिबान ला प्रोत्साहन पाकिस्तानचे आणि पाकिस्तानला तालिबान चे !
दक्षिण आशियात भारताची वाट निर्वेध नको आणि भारतावर अंकुश ठेवण्यासाठी पाकिस्तान उपयोगी पडत नाही म्हणून तर तालिबान ला रस्ता मोकळा केला नाही ना ? अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे . चीन , पाकिस्तान आणि तालिबान एकत्र येऊन भारतापुढे
नवे दहशतवादी आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे .
दुर्दैवाने भारतातली तमाम विरोधी पक्ष आणि डावे , लुटीयन्स याना ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजली तरी डोळे मिटून , तोंड बंद करून बसायचे आहे .कारण ही आमची तथाकथित पुरोगामी धर्मनिरपेक्ष परंपरा आहे .
देशाच्या स्वातंत्र्यानंतर परराष्ट्र धोरण ठरवताना सुद्धा भारतातल्या मुसलमानांना दुखवायचे नाही म्हणून कट्टरवादी विचारापुढे आम्ही गुडघे टेकवत राहिलो आणि फाळणी स्वीकारण्याच्या मानसिकतेतून च देश आणि देशा बाहेरील मुस्लिम समस्येकडे बघत राहिलो .
पण आता कधी नव्हे ते योग्य दृष्टिकोन असणारे केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्व आम्हाला मिळाले आहे . जो पर्यंत जग मुस्लिम प्रश्न हा मुळातून समजून घेत नाही तो पर्यंत प्रत्येक देशात कमी अधिक फरकाने तालिबानी वृत्ती डोके वर काढत राहणारच आहेत . फ्रांस हे त्याचे अलीकडील जिवंत उदाहरण आहे .
भारतातील विचारवंत आणि ट्विटर टूल किट गॅंग ला आज काबूल हुन येत असलेला महिलांचा आक्रोश ऐकू येणार नाही . तेथील महिलां च्या बरोबर तालिबानी सैन्य
करत असलेले अत्याचार , त्यांना सेक्स गुलाम म्हणून जे
वागवले जात आहे, त्या वर शबाना , जया , स्वरा याना काही घेणे देणे नाही कारण हिंदूंना दूषणे द्यायचे आणि मुस्लिम कट्टरता वाद मात्र दुर्लक्षित करायचा हीच येथील पुरोगामी वैचारिक मान्यता आहे !
पण भारतातील सुजाण नागरिकांनी या अफगाण घडामोडीकडे नीट लक्ष देण्याची आणि शिकण्याची गरज आहे . ज्या देशात स्थिर सरकार आणि खंबीर नेतृत्व नाही तेथे मुस्लिम कट्टरता वाद लवकर पसरतो आणि हळू हळू आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा भाग बनतो हा इतिहास आहे .
सुदैवाने खंबीर नेतृत्व आणि स्थिर केंद्र शासन या बाबतीत आम्ही सध्या नशीबवान आहोत ! गरज आहे ती आशा नेतृत्वाचे आणि सरकारचे हात बळकट करण्याची ! विरोधी पक्षात खरेच जर योग्य विचार करणारी काही मंडळी असतील तर निदान परराष्ट्र आणि संरक्षण या दोन बाबतीत तरी मोदी विरोधी अजेंडा बाजूला ठेवत देशहिताचा विचार त्यांनी केला पाहिजे !
आमच्या देशाच्या वैश्विक जबाबदारीची कधी नव्हे इतकी आवश्यकता निर्माण होत आहे . अशा वेळेस सशक्त , आत्मनिर्भर , एकसंघ राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आम्ही कटिबद्ध होणे
हेच याचे उत्तर आहे .
अफगाणिस्थान मध्ये वाजलेली धोक्याच्या घंटेचा आवाज भले भारतातील काही कर्ण बधिर लोकांना ऐकू जाणार नाही , काही जण ऐकू येऊ लागले तर कान बंद करतील पण ज्यांना तो आवाज स्पष्ट ऐकू येतो आहे , किमान त्यांनी तरी सावध झालेच पाहिजे ! ही काळाची गरज आहे .
या संदर्भात काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झालेला श्री.सुजीत भोगले यांचा "Whats Wrong With ISLAM ?" हा लेख आठवला.
०९/११ पासून जगभरातील विचारवंत या गोष्टीवर डोकेफोड करत आहेत कि इस्लाम या धर्माला मानवीय कसे करता येईल ? या धर्माच्या लोकांच्या सह शांततापूर्ण सहजीवन कश्या प्रकारे साधता येईल ? सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे. whats wrong with ISLAM ? How to tame it ? Make it more human ?
आपल्याकडच्या न्यूज च्यानेल वरचा आक्रस्ताळेपणा तेथील चर्चात नसतो. ते लोक खरे विचारवंत आणतात आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.
इस्लाम चा उदय ७-८व्या शतकातील. त्याच्या ८०० वर्ष आधी ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन धर्मात बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. हे आपल्याकडील खूप कमी लोकांना माहित असते. दोन्ही धर्माचे तत्व अधिकाधिक धर्मप्रसार हेच होते आणि आहे. त्यामुळे त्या दोघांच्यात संघर्ष घडला आहे. मुस्लिमांनी त्याला "जिहाद" संबोधले आणि ख्रिश्चन मंडळीनी "क्रुसेड".
परंतु या युद्धात ख्रिश्चनधर्मियांना पराभव पत्करावा लागला आहे हा इतिहास आहे. दोन्ही धर्मानी जगभर आपले धर्म अधिकधिक विस्तारता यावे यासाठी उच्छाद मांडला होता. हा पण इतिहास आहे. आजही या दोन्ही धर्माचे कट्टर अनुयायी त्याच पद्धतीने साम दाम दंड भेद वापरत आपल्या धर्माचा अधिकाधिक विस्तार करणे हेच धोरण राबवत आहेत.
औद्योगिक क्रांतीच्या नंतर ख्रिश्चन धर्मियांनी शस्त्र बदलले. व्यापार आणि तंत्रज्ञान हे शस्त्र वापरून त्यांनी इस्लामी आक्रमणाला थोपवले. काही ठिकाणी त्यांना मांडलिक सुद्धा बनवून ठेवले. इस्लामी आक्रमक मात्र त्यांच्या जुन्याच रांगड्या पद्धतीने स्वतःचे धर्मतत्व रेटून नेत राहिले.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा नकाशा व्यापक पद्धतीने बदलला. ख्रिश्चन ब्रिटन भारतीय मुस्लिमांना मदत करून देश फोडून देतात. हे वरवर खूप सहज कृत्य वाटते पण या मागील दीर्घ नियोजन लक्षात घ्या. मुस्लिमांना या देशाचा एक हिस्सा तोडून द्यायचा आणि उरलेल्या हिस्श्यात आपल्या धर्माचा प्रसार रेटायचा हे ब्रिटीश ख्रिश्चन मंडळींचे धोरण.
आजच्या भारताचा नकाशा आणि आपल्याकडील वाढलेली ख्रिश्चन आणि मुस्लीम लोकसंख्या पाहता हा डाव पूर्ण वाया गेला असे म्हणता येणार नाही.
मध्यपूर्वेत इस्लामचे पूर्ण वर्चस्व असले तरी सुद्धा ख्रिश्चन मंडळीनी तेलाचे साम्राज्य स्वतःच्या हातात धरून त्यांना वेठीस ठेवले आहे. परंतु इस्लामी राज्यकर्ते ख्रिश्चन मंडळीना धर्मात आणि त्यांच्या देशाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करू देत नाहीत. जिथे हा होतो तिथे संघर्ष आणि युद्ध. मग एकाला दुसऱ्याच्या विरुद्ध लढवण्याचे हातखंडे उपाय अजमावले जातात.
मध्य पूर्वेतील इस्लामी राष्ट्रे आपल्या धर्मबंधू राष्ट्रांना अधिकाधिक आर्थिक मदत करत हा अजेंडा राबवायला सहाय्य करतात. याचा परिणाम आज आफ्रिकेत इस्लाम खोलवर घुसला आहे. पाकिस्तान ला प्रचंड ताकद देऊन सौदी अरेबिया ने पोसले आहे. चीन असेल किंवा रशिया हे दोन्ही देश सुद्धा मुस्लीम मूलतत्ववादाशी लढत आहेत.
थोडक्यात रासवट पद्धतीने इस्लाम आणि सालंकृत पद्धतीने ख्रिश्चन धर्म जगाला स्वतःच्या तत्व प्रणालीने गिळण्यासाठी आतुर झालेले आहेत.
या सगळ्यांशी वैयक्तिक पातळीवर इतर धर्म आणि इतर विचारसरणी संघर्ष करत आहेत.
पहिला आहे ज्यू धर्म. त्यांचे मुख्य स्थान म्हणजे इस्त्रायल परंतु ते जोडीला अमेरिकेत आणि जगभर पसरले आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे ज्यू लोक ख्रिश्चन आणि इस्लाम शी मुकाबला करण्याच्या इतके समर्थ आहेत. कट्टर धर्माभिमानी आणि राष्ट्राभिमानी आहेत.
दुसरा आहे भारतात हिंदू धर्म ज्याचे मूळ रूप सनातन वैदिक धर्म आहे.
बुद्ध धम्म जी सनातन वैदिक धर्माचीच शाखा आहे. पण हिचा विस्तार आता चीन, जपान आणि आग्नेय आशियात अधिक आहे.
बाकी जगभर स्थानिक रहिवाश्यांचे उपासले जाणारे धर्म ज्यांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मियांनी बुतपरस्त आणि काफिर अर्थात हिथन आणि पेगन असे अनुक्रमे संबोधले जाते.
जगभरात ख्रिश्चन धर्मीय ३३ टक्के आहेत. मुस्लीम २४ टक्के, हिंदू १५ % आहेत, निधर्मी किंवा नास्तिक १६ %, बुद्ध ७ %, चीनचा पारंपारिक धर्म ५.५ % हे मुख्यत्वे पालन केले जाणारे धर्म आहेत.
सनातन वैदिक धर्म अर्थात त्याचे भ्रष्ट रूप असणारा हिंदू धर्म हा या सगळ्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भरडून निघतो आहे. त्याचे कारण आपल्या धर्माचे मुल तत्वज्ञान तुम्ही कोणत्याही मार्गाने ईश्वराची आराधना करा अंतिमतः तुम्ही त्याच सत्य, ज्ञान स्वरूप निर्गुण निराकार ब्रह्माच्या पर्यंत पोचतात हे आहे. ( ख्रिश्चन आणि मुस्लीम सुद्धा ईश्वराच्या स्वरूपाला निर्गुण निराकारच मानतात ). त्यामुळे हिंदू हे इतर धर्मीय लोकांच्या बाबतीत सहिष्णू असतात.
धर्मांतर हि संकल्पनाच हिंदू धर्माला मान्य नाही. त्यामुळे अन्य धर्मीय व्यक्ती हिंदू होणे हि एक दुरापास्त गोष्ट आहे. जरी त्या व्यक्तीची इच्छा असेल तरी सुद्धा ते सुलभ नाही.
दुसरीकडे इतर धर्मीय मात्र कोणत्याही प्रकारे हिंदुना प्रलोभन दाखवून किंवा अंधश्रद्ध हिंदूंना बाटवले आहे असे भासवून आपल्या धर्मात ओढून घेण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत.
सुशिक्षित हिंदूंच्या मनात धर्माच्या बद्दल असणारी आत्यंतिक उदासीनता हा मुद्दा सुद्धा हिंदू धर्माच्या संकोचास कारणीभूत ठरतो आहे.
त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा पाश्चात्य विचारवंतांच्या प्रमाणे आपल्या देशातील विचारवंतानी आढावा घेतला नाही आणि आपल्यात सुधारणा करणे, कायदे आपल्या धार्मिक विचारसरणीला अनुकूल करून घेतले नाही तर भविष्यात हिंदू धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहू शकतो.




Comments