तुर्की इतिहास
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
तुर्कस्तानची राजधानी "अंकारा" येथे लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या अनेक स्मृती "अनातोलियन" संस्कृतीच्या संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" पूर्वजांमधील व्यापारी मंडळी तुर्की संस्कृतीत "फ्रायजियन" म्हणून ओळखले जात असत.त्यांनी इसवी सन पूर्व १९५० ते इसवी सन पूर्व १७५० या काळात तुर्कस्तानात व्यापारी वसाहती(Phrygian Trading Colonies) व व्यापारी संघ(Kultepe) निर्माण केले.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या व्यापारी मंडळींनी आपल्या बरोबर आपल्या कुलदेवताही तुर्कस्तानात केल्या.त्या तुर्कस्तानात "माता" ऐवजी "मातर" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
ज्या प्रमाणे लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता उत्तर भारतात वेगळ्या नावाने व दक्षिण भारतात(कंसातील नावे) वेगळ्या नावाने ओळखल्या जातात त्याच प्रमाणे त्या तुर्कस्तानात देखील वेगळ्या नावाने ओळखल्या जातात.
खालील नावे पहा:-
१. कालिका(मठांबा)
२. शाखांबरी(आशापुरी)
३. धाडीमाता(भवानी)
४. धानोप(सुलाई)
५. नांदोळ(आशापुरी)
६. मर्मी(म्हाळसा)
७. झातला(मनूदेवी)
८. ज्वाला(पेडकाई)
९. भादवी(खंबिका)
१०.जोगनिया(जोगेश्वरी)
११.लालबाई-फूलबाई(सारजा-बारजा)
१२.जिनमाता(अन्नपूर्णा)
१३.आवरा(एकविरा)
१४.कवाई(धनाई-पुनाई)
कुलदेवतांच्या माहिती नंतर आता तुर्कस्तानातील "मातृका पूजन" या विधीची माहिती घेऊ या ! अन्न,वस्र व निवारा या प्राथमिक गोष्टींची पूर्तता झाली की जगातील कोणताही प्राणी वळतो तो "पुनरूत्पादना" कडे !
ही पुनरूत्पादनाची देवी प्रसन्न व्हावी या साठी खणा नारळाने व फळफळावळे यांनी सुवासिनीची "ओटी" भरण्याची प्रथा लाड सका(शाखीय) वाणी समाजात आहे.या समाजातील कित्येक सण सुध्दा या संकल्पनेला धरून आखलेले आहेत.
तुर्कस्तानात देखील "सका" लोकांनी हीच संकल्पना "हासिलार तन्नका" या देवतेच्या पूजनाच्या स्वरूपात चालू ठेवल्याचे आढळून येते.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी,M.D.(Pathology) (देव,भडगावकर)
व्यवस्थापक, फेसबुकवरील "'History of Lad Saka (Ladshakhiy) Wani Samaj" हा अभ्यासगट
(सभासद संख्या - ५५८९)
Comments