top of page

थॅलेसेमिया प्रतिबंध

  • dileepbw
  • Sep 6, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजात सुमारे ५% समाज बांधव "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराचे "वाहक (Carriers)" असावेत असे या समाजाच्या स्थलांतराचा इतिहास सांगतो.

अशा समाज बांधवांनी परस्परांशी विवाह करण्याचे टाळल्यास हा समाज सहजपणे "थॅलेसेमियामुक्त" समाज करता येईल.

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील समस्त समाज बांधवांची "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करायची झाल्यास काय करावे लागेल ?

किमान विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी तरी ही तपासणी अवश्य करावी व दोन थॅलेसेमिया वाहकांनी परस्परांशी विवाह करणे नक्कीच टाळावे.

सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी ही वैज्ञानिक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे सामाजिक कार्य करणार्‍या सौ.रेखाताई मालपुरे, कल्याण यांनी आज लाड सका(शाखीय) वाणी समाज,कल्याण शाखेच्या महिला मंडळातर्फे आयोजित "द्वारका धाम,सौराष्ट्र" या मोहिमेवर गेलेल्या समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांचे कुंकूम तिलक लावून स्वागत केले.

ही सुवर्णसंधी साधून त्यांनी सर्व भक्तांना "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करण्यास प्रवृत्त केले.त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०८४)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page