"देव" कुलाचा इतिहास
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील एका गटाचे "देव" हे समान कुलनाम हे "देव" कुलाचे वैशिष्ट्य !
"देव" कुलातील अनेक लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजबांधव समाजात निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्य करीत असले तरी त्यांचे गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतर झाल्यानंतरचे कुलग्राम जळगाव जिल्ह्यातील,चाळीसगाव तालुक्यातील "पिलखोड/पिंपळगाव हरेश्वर" हे समजले जाते.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील एकतेची भावना निर्माण करण्यास कुलाचे समान नाव असलेले "कुलनाम" अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलनाम धारण करणाऱ्या समस्त समाजबांधवांना माझे विनम्र आवाहन आहे की त्यांनी "देव कुलवृत्तांत" लेखनास सक्रिय हातभार लावावा.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलनाम धारण करणाऱ्या किती समाजबांधवांना "भगवान परशुराम" यांचे मातुल घराणे(राजा गाधी यांची सुकन्या रेणुकामाता) हे आपल्या "सका" पूर्वजांचे "घराणे" असल्याचे माहित आहे ?
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments