नीलमण्यांचा देश गांधार
- dileepbw
- Aug 19, 2021
- 3 min read
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी "सका/शक/Scythian" साम्राज्याचा अभ्यास करताना तो आपल्या पूर्वजांचा इतिहास असल्याने बारकाईने अभ्यासावा.ही नम्र विनंती.त्यासाठी माझ्या वाचनात आलेली माहिती या अभ्यासगटात प्रसृत करण्यात आलेली आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांच्या "पोषाखा" बद्दल जाणून घ्यायचे असेल तर ENCYCLOPÆDIA IRANICA या ज्ञानकोषातील S.A.Yatsenko यांनी लिहिलेले "CLOTHING OF THE IRANIAN TRIBES ON THE PONTIC STEPPES AND IN THE CAUCAUS" हे प्रकरण वाचायला हवे.
"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या पोषाखाची वैशिष्ट्ये :-
१.शिरोवस्त्र(caftan) -"सका/शक/Scythian" लोक आपले केस कपाळावर ओढून मध्यावर त्यांची गाठ बांधत असत व दोन्ही बाजूला केसांची झुलूपे सोडत असत.तर स्त्रिया दोन वेण्या ठेवीत असत. शेतकरी,आदिवासी व राजपुरूष आपले वैशिष्ट्यपूर्ण शिरोवस्त्र व त्यावरील वैशिष्ट्यपूर्व कलाकुसरीच्या(अॅनिमल आर्ट) दागिन्यांमुळे (नीलमणी,सोन्याचे रत्नजडीत कमरपट्टे,सोन्याची रत्नजडीत कंकणे इ.) सहज वेगळे ओळखू येत असत.
"सका/शक/Scythian" राजपुरूष सोन्याचा अर्धवर्तुळाकार मुकूट घालत असत.तर सेनाधिकारी "लाल" रंगाचे शिरस्त्राण वापरीत असत.
राजघराण्यातील "सका/शक/Scythian" स्त्रिया डोक्यावर काठांना सोन्याची पदके लावलेले कापड व या कापडाभोवती भोवती कलाकुसर केलेले सोन्याचे वेटोळे(calathos) किंवा त्रिकोणी कॅपसारखा मुकूट (tiara) घालत असत.
२.कुडता(kurta) - लोकर,ज्युटाचे कापड किंवा हरणाच्या कातड्याचे दोन तुकडे खांद्यावर व दोन्ही बाजूंनी शिवलेले,बाह्या असलेले,पुढून उघडता येणारे व बटनांऐवजी डाव्या बाजूला किंवा मध्यावर बंध असलेले असे.हिवाळी कपड्यांसाठी केसाळ प्राण्यांची (उदा. मेंढी,अस्वल,मरमाॅट,खार,कोल्हा,आॅटर इ.) कातडी वापरली जात असे.इ.स.च्या पहिल्या शतकापासून चीनचे रेशीम व इ.स.च्या चवथ्या शतकापासून कापसापासून विणलेले कापड उपलब्ध झाल्याने त्याचा वापर कुडते बनविण्यासाठी सुरू झाला.
"सका/शक/Scythian" महिला पुढच्या बाजूने उघडणारा पायघोळ झगा घालत असत.काही वेळा अशा झग्यांना(candys) ढगळ बाह्या जोडल्या जात असत.पुढे या कुडत्यांना आकर्षक बनविण्यासाठी त्यांना झालर,सोन्याची कलाबूत,मणी,पदके इ.लावायला सुरूवात झाली.लहान मुलांचे कपडे देखील अशाप्रकारे सजवले जात असत. पुढे सलग कापडाऐवजी एकमेकांना जोडलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या पट्ट्या वापरण्यास सुरूवात झाली.
मृतदेहाला सुध्दा असेच सजवलेले नवे कपडे चढविले जात असत. इ.स.च्या दुसर्या शतकात बिनबाह्यांचे व खांद्यावर बंध असलेले झगे वापरायला सुरूवात झाली.
३.जाकिट(tunic) - घोडेस्वारीला सोपे जावे म्हणून दोन्ही बाजूला लांबलचक कातरलेले व थंडीपासून बचाव करण्यासाठी बंद गळ्याचे असायचे.
४.तुमान(trousers) - घोडेस्वारीला सोपे जावे म्हणून तंग विजारी वापरल्या जात असत.
५.बूट - थंडीपासून बचाव करण्यासाठी गुढग्यापर्यंत पोहोचणारे व बंधांनी बांधले जाणारे लांब "बूट" वापरले जात असत.इतर वेळी चामड्याच्या दोन तुकड्यांना लेसने एकत्र बांधले जाणारे व चवड्यापाशी वर उचलेले टोकदार "शुज" वापरले जात असत.
६."सका/शक/Scythian" लोकांचा हा वैशिष्ट्यपूर्ण पोषाख पुढे Sarmatians,Massagetae,Dahae,Parthians,Bactrians या लोकांनी उचलला.
७."सका/शक/Scythian" स्त्री व पुरूष फक्त आपला पोषाख सजवून थांबले नाहीत तर त्यांनी आपले शरीर सुध्दा गोंदवून सजवायला सुरूवात केली.
८.इ.स.पू.पहिल्या शतकात "सका/शक/Scythian" लोक Alans, Huns,Yuezhi,Greeks,Maeotae इ.लोकांच्या संपर्कात आले. त्यामुळे "सका/शक/Scythian" पोषाख या लोकांमधे देखील रूढ झाला.सलग कापडाचा,डाव्या खांद्यावर गाठ मारून बांधायचा, त्रिकोणी गळ्याचा,चामडी गोठ मारलेला व त्यात सोन्याचे मणी जडविलेला झगा फारच लोकप्रिय झाला.महिलांच्या झग्याला अरूंद बाह्या,छातीवर व डाव्या खांद्यावर बंध असत.कमरेखाली एकमेकाला समांतर असलेल्या सोन्याच्या मण्यांच्या माळा लावलेली तंग तुमान नेसली जात असे."सका/शक/Scythian" लोकांच्या झग्यांना कुठेही "खिसा" नसे.सर्व वस्तू कमरपट्ट्याला टांगून ठेवायची पध्दत होती.
ज्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बाधवांना,विशेषत: महिलांना आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या वस्त्रप्रावरणांबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी खालील संदर्भ अवश्य वाचावे.ही नम्र विनंती :-
1.E. V. Cernenko, The Scythians 700-300 B.C., London, 1983.
2.M. B. Gorelik, “K ètnicheskoĭ identifikatsii personazheĭ, izobrazhennykh na predmetakh Amudar’inskogo klada” (On the ethnic identification of the personages depicted on objects from the “Oxus treasure”), in V. G. Lukonin, ed., Khudozhestvennye pamyatniki i problemy kul’tury Vostoka (Artistic monuments and problems in the culture of the east), Leningrad, 1985, pp. 36-46.
3.L. S. Klochko, “Skifskie nalobnye ukrasheniya” (Scythian forehead ornaments), in V. D. Baran, ed., Novye pamyatniki drevneĭ i srednevekovoĭ khudozhestvennoĭ kul’tury (New monuments of ancient and medieval artistic culture), Kiev, 1983, pp. 37-58.
4.T. V. Miroshina, “Skifskie kalafy” (The Scythian calathos), Sovetskaya Arkheologiya, 1980/1, pp. 30-45.
5.Idem, “Nekotorye tipy skifskikh zhenskikh golovnykh uborov IV-III vv. do n.è.” (Some types of Scythian women’s headdress in the 4th-3rd centuries b.c.e.), Sovetskaya Arkheologiya, 1981/4, pp. 46-69.
6.S. A. Yatsenko, “O drevnikh prototipakh muzhskoĭ plechevoĭ odezhdy Osetin” (The ancient prototypes of the Ossetic men’s shoulder garments), in V. A. Kuznetsov, ed., Arkheologiya i traditsionnaya ètnografiya Severnoĭ Osetii (Archeology and traditional ethnography of the Northern Ossetes), Ordzhonikidze, 1985, pp. 25-36.
7.Idem “Diademy stepnykh kochevnikov Vostochnoĭ Evropy v sarmatskuyu èpokhu” (Diadems of the steppe nomads in eastern Europe in the Sarmatian period), in Kratkie soobshcheniya Instituta arkheologii Akademii nauk SSSR (Moscow) 186, 1986, pp. 14-20.
8.Idem, “K rekonstruktsii zhenskoĭ plechevoĭ odezhdy Sarmatii” (On the reconstruction of the female shoulder garments of the Sarmatians), Sovetskaya Arkheologiya 1987/3, pp. 166-76.




Comments