पिलखोडचे महात्म्य
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
"पिलखोड" हे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांचे "कुलग्राम" असले तरी व्यवसायानिमित्त त्यांचे आजूबाजूच्या ग्रामांमध्ये स्थलांतर झाल्याचे आढळते.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांच्या दृष्टीने अजून एक महत्वाचे गाव म्हणजे "हरेश्वर पिंपळगाव"(Coordinates: 20°34'45"N 75°29'21"E, Pin: 424203) !
"बहुला" नदीच्या काठावर वसलेले हे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांचे गाव गणितज्ञ भास्कराचार्यांची कन्या "लीलावती" हिची समाधी असलेल्या, तेथील हेमाडपंथी "हरेश्वर" मंदिराकरिता सुप्रसिद्ध आहे.
"खानदेशचे प्रती पंढरपूर" म्हणून ओळखले जाणाऱ्या "हरेश्वर पिंपळगाव" या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांच्या गावी दर वर्षी आषाढी एकादशीला मोठी "रथयात्रा" भरते. गेले २२० वर्षे ही प्रथा अव्याहतपणे चालू आहे.
"जामनेर" रेल्वे स्टेशन पासून (जामनेर-पाचोरा प्रवासी आगगाडी नं.५२१२२ ने )फक्त २६ कि.मी.म्हणजे केवळ दीडतासाच्या अंतरावर हे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांचे देवस्थान आहे. लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील समस्त "देव" कुलबांधवांनी न चुकता त्याला भेट द्यायला हवी.
गोविंद महाराज मंदिर,विठ्ठल मंदिर,राम मंदिर,भवानी मंदिर,पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अशा प्रेक्षणीय मंदिराबरोबरच संपूर्ण पिंपळगावाला पाण्याचा पुरवठा करणारे,तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हे गावाचे "कोल्हे धरण" व "धाकलेगाव" धरणही पहाण्यासारखे आहे.
चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्य,पितळखोरा लेणी व पाटण देवी ही प्रेक्षणीय स्थळे सर्वांनी जरूर पहावी पण त्याचबरोबर लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांनी जरूर आपल्या मूळ कुलग्रामालाही भेट द्यायला विसरू नये .
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments