top of page

"पितृपंधरवडा"

  • dileepbw
  • Sep 6, 2022
  • 1 min read

पितृपंधरवड्याच्या निमित्ताने लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची "श्राध्द" या संकल्पनेबद्दलची खाली दिलेली माहिती समस्त समाज बांधवांनी अवश्य वाचावी.ही नम्र विनंती.

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.त्यामध्ये प्रकाशित झालेली "सका/शक/Scythian" पूर्वजांची "श्राध्द" ही संकल्पना खालील प्रमाणे :-

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते.हेच लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

भारतात प्रवेश करण्यापूर्वी या सका/शक/Scythian" लोकांना कोणताही धर्म माहित नव्हता.त्यांची प्रार्थनास्थळे,वेदी,देव, मूर्ती,पुजारी असे काहीही नव्हते.त्यांच्या भूत-प्रेत-आत्मा,जादूटोणा, चेटूक अशा ज्या काही अंधश्रध्दा होत्या त्याला "शमानिझम/Shamanism" असे म्हणतात.अशा अंधश्रध्दा जोपासणार्‍या तांत्रिक/मांत्रिक/Shaman अर्धस्त्री-अर्धपुरूष लोकांना (Effeminate males) "Enarees' असे म्हणतात.अशा व्यक्ती स्त्रीवेष धारण करून स्त्रियांप्रमाणेच उच्चारवात बोलत असत.

या सका/शक/Scythian" लोकांचा अंत्यविधी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे.राजाचा अंत्यविधी ४० दिवस चालत असे.त्यावेळी राजदरबारी लोक केशवपन करीत.चेहेर्‍यावर जखमा करून घेऊन दुख: प्रदर्शित करीत. राजाच्या आवडत्या वस्तूंचा बळी देवून (आवडती राणी, भालदार-चोपदार, आचारी, निरोप्या,शस्त्र इ.)त्या त्याच्या थडग्या शेजारी पुरल्या जात असत व त्यावर ६० फूट उंचीचे थडगे बांधले जात असे.एक वर्षानंतर राजाच्या आवडत्या सैनिकांपैकी ५० सैनिकांचा बळी देवून त्यांचे मृतदेह राजाच्या थडग्याभोवती रिंगण करून पुरले जात असत.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page