top of page

पितृ देवो भव

  • dileepbw
  • Feb 18, 2022
  • 2 min read

आज माझ्या तीर्थरूपांचा १२ वा स्मृतीदिन ! त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन ! माझे तीर्थरूप निवृत्त प्राचार्य कै.बाळकृष्ण महादेव वाणी यांच्या स्मृती माझ्या मनात "चिरंतन" आहेत.

"तव स्मरण सदैव स्फूर्तीदायी आम्हा घडो" !


माझे तीर्थरूप पनवेलच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.शासकीय सेवानिवृत्तीनंतर दोन वर्ष पुण्याच्या म.गांधी अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते.त्यानंतर वयाच्या ९२ वर्षांपर्यंत रोज संस्कृत वांड्गमयाचे अध्ययन, मनन व चिंतन करीत असत.कालीदासाचे "मेघदूत" हे त्यांचे सर्वात लाडके काव्य ! सारखे गुणगुणायचे व माझ्याकडून वदवून घ्यायचे.त्यांनी माझ्या लहानपणी मला शिकवलेल्या संस्कृत सुभाषितांपैकी रोज एकतरी त्यांना म्हणून दाखवावेच लागे.मगच ते शांतपणे झोपत असत. स्वत: जगन्नाथ शंकरशेट स्काॅलर असल्याने व बी.ए.(संस्कृत) या विषयात १९३५ साली पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आलेले असल्याने एका तरी मुलाने "संस्कृत" या विषयात पारंगत असावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. पण मी शाळेत "संस्कृत" शिकायच्या काळात त्यांची बदली महाराष्ट्रातल्या विदर्भ व मराठवाडा या "संस्कृत अनभिज्ञ" विभागात झाल्याने ते मला दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत घरीच "संस्कृत" शिकवित असत.एक "सुभाषित" अर्थासह पाठ केल्यास मला एक रुपया "अर्थ" प्राप्ती होत असे.


माझ्या तीर्थरूपांचे शिक्षण चाळीसगाव येथे घरची अत्यंत गरिबी असल्याने "नादारी" वर झालेले आहे. भोजन-निवासाची विनामूल्य सोय व्हावी म्हणून अख्खे वसतीगृह ते शेणाने सारवत असत.तरी ही त्यांनी प्रथम क्रमांक कधीच गमावला नाही. बोर्डाच्या परीक्षेत देखील ते शाळेत पहिले आले होते. घरच्या अत्यंत गरिबीमुळे पुढे शिक्षण घेणे शक्यच नव्हते.पण त्यांच्या मुख्याध्यापकांनी पुण्याच्या स.प.महाविद्यालयात शब्द टाकून त्यांच्या पुढील शिक्षणाची "विनामूल्य" सोय लावून दिली व ती त्यांनी सार्थ करून दाखविली.ही आमच्या सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.


मी बालवाडीत असल्यापासून ते पार चवथी व सातवीची शिष्यवृत्ती मिळेपर्यंत ते रोज किमान एक तास तरी माझा अभ्यास घेत असत.त्यांनी मला लहानपणीच लावलेली ही अध्ययन, मनन व चिंतनाची सवय आज देखील माझ्यासाठी उपयुक्त ठरत आहे.


आजच्या त्यांच्या १२ व्या तर स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page