top of page

पीत वर्णाचे महात्म्य

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी धुळे या जिल्ह्यातील "थळनेर" या गावची माहेरवाशीण व लाड वाणी समाजकन्या,गानकोकिळा श्रीमती लतादीदी मंगेशकर यांनी वर्णन केलेल्या त्यांच्या बालपणीच्या "गणपती बाप्पां" च्या स्मृती समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी अवश्य वाचाव्या.

"व्यापार" हा पारंपारिक व्यवसाय असलेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "गणपती बाप्पा" हे आराध्य दैवत ! तर "गणपती बाप्पां" चे वाहन "मूषक" हे "सुबत्ते" चे लक्षण !

नोटा व नाणी(चलन) अस्तित्वात येण्यापूर्वी व्यापारी मंडळी आपली संपत्ती पिवळ्या रंगाची वनस्पतीजन्य धान्याची "कणसे" ,पिवळ्या रंगाचा प्राणीजन्य पदार्थ "तूप" व आपल्या व्यवसायातून संकलित केलेला "सोने" हा पिवळ्या रंगाचा धातू या स्वरूपात मोजत असत.त्यामुळे "पीत(पिवळा)" रंग हा व्यापारी म्हणजे "वैश्य" वर्णाचे प्रतिक मानला जात असे.

जेथे "कणीस" तेथे "उंदीर" ! त्यामुळे "गणपती बाप्पां" चे वाहन "मूषक" हे आर्थिक "सुबत्ते" चे लक्षण मानले जाते.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनाचा "ध्वज" व "बोधचिन्ह" ठरविताना या गोष्टींचा अवश्य विचार व्हावा.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६६१८)

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page