top of page

"पुण्याचे मारूती"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 3 min read

"पुण्याचे मारूती"


सुभाष सुराणाचा "पुण्याचे मारूती" हा लेख वाचून मी १९७३ सालात म्हणजे आपल्या बी.जे. मेडीकल काॅलेजच्या प्रवेशाच्या वर्षात जाऊन पोहोचलो. या प्रत्येक मारुतीच्या त्या वेळच्या माझ्या काही मजेशीर आठवणी आहेत.सांगतो.

खरे तर "मरुतः अपत्यं पुमान् मारुतिः" म्हणजे

"मरुता" च्या म्हणजे "वायुदेवा" च्या अपत्याचे, अंशाचे नाव "मारुती" असे आहे.यामुळे,मारुती हा शब्द "भीमा" साठी सुद्धा विशेषण म्हणून वापरता येऊ शकतो.नंतर इन्द्रवज्राच्या हनुवटीवर झालेल्या आघाताने मारुतीला "हनुमान" हे नाव मिळाले.हा प्रसंग घडण्यापूर्वी हनुमान हे नाव प्रसिद्ध झालेले नव्हते.पुण्याच्या मारूतींची नावे मात्र सुप्रसिध्द आहेत कारण ती "वैशिष्ट्यपूर्ण" आहेत.

पनवेलच्या काॅलेज मधील माझा वर्गमित्र डाॅ.विजय सदाशिव भगत हा त्यावेळी टिळक आयुर्वेद महाविद्यालयात शिकत होता.आपल्या बी.जे. मेडीकल काॅलेजमधे प्रदीर्घ संप चालू असल्याने मला काहीच उद्योग नव्हता.मग काय ? समस्त पुणे शहर पिंजून काढायचे ठरविले. पुण्यात पावलोपावली मंदिरे ! त्या मानाने पनवेलला मोजकीच मंदिरे ! मला तर फक्त शाळेजवळची "गावदेवी" व "बल्लाळेश्वर" एवढीच माहित होती. त्यामुळे पुण्याच्या पावलोपावली दिसणार्‍या मंदिरांबद्दल फारच उत्सुकता वाटू लागली. डाॅ.विजयला सारखे सारखे "मुतारी" त जायला लागायचे.मग मी वैतागून शेजारच्याच "मंदिरात" शिरायचो व त्याचा मिळेल तो इतिहास अभ्यासायचो. त्याची डाॅ.विजयला फार गंमत वाटायची. एकदा लक्ष्मीरोडवर "धक्क्या" मारूती दिसला.त्याच्याकडे वळून पहायला गेलो तर एक "पुणेरी सायकल" वाली मला"धक्का" मारून गेली. डाॅ.विजय लगेच उद्गारला "कळले ना ? याचे नाव "धक्क्या" मारूती का ते ? असाच एकदा "अचानक मारूती" दिसला.त्याच्या त्या "अचानक" दर्शनाने त्याच्या नावाचा शोध घेण्याच्या फंदातच पडलो नाही.पण ज्यांचा शोध लागला ते "मारूती" आज सांगतो.

नांवे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही.मारुतीबरोबरच इतरही देवस्थानांना असलेली चमत्कारिक नावे आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात.आज फक्त "पुण्याचे मारूती" यांच्याबद्दल सांगतो.

पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक "भन्नाट" नावे ठेवलेली आढळतात.खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत.या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार,वस्ती,तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नांवे खूप उपयुक्त ठरतात.‘‘नांवात काय आहे ?’’ असे शेक्सपियरने म्हटले होते.परंतु ‘‘नांवातच तर सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात! वाचा.

पुण्यामध्ये असंख्य "देवालये" आहेत.त्याचा आकार एखाद्या खोक्यापासून तर विशाल मंदिरांपर्यन्त आहे. इतरत्र न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र,गमतीशीर नावे.कधी कधी तर ती अगदी "टिंगल" वजाही भासतात."पुणेरी तिरकसपणा" ने देवांची सुद्धा गय केलेली नाही.हल्ली जर एखादे नव्याने असे नाव दिले तर मोठ्याच वादाचे प्रसंग उद्भवतील.पूर्वी ही बहुसंख्य देवळे पत्ते ओळखण्यासाठी "लॅन्डमार्क" म्हणून वापरली जायची.मात्र हल्ली या देवळांच्या आसपास इतर मोठाल्या स्ट्रक्चर्स जसे थिअ‍ॅटर्स, मॉल्स, हॉटेले झालीत त्यामुळे ह्या देवळांचे लॅन्डमार्क्स मागे पडत चाललेत व त्यामुळे नव्या पिढीच्या विस्मरणातूनही ही देवळे चाललीत.तसे होऊ नये स्मृतीला "ऊजाळा" देतो.

१.बटाट्या - शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरणार्‍या बटाट्यांच्या बाजारातला.

२.सोन्या - सराफांच्या गल्लीतला.तेथे "कोठारी बुक डेपो" येथे आपली मेडीकलची पुस्तके मिळायची.

३.उंटाड्या - केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा.तिथे उंटांचा तळ असायचा.त्यामुळे तिथला मारुती झाला ‘उंटाड्या मारुती’ ! तेथे पेंटरने गफलत करून पाटीवरील अनुस्वाराची जागा बदलल्याने मी त्याला "उटांड्या" म्हणायचो.

४.विसावा - स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी येथे थांबायची.

५.डुल्या - पानिपत इथे मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून थरथर कापणारा.दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का ? यासाठी म्हणे या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान "डोलवून" त्याला मान्यता दिली.म्हणून हा झाला डुल्या मारुती !

६.भिकारदास - भिकारदास शेठजींच्या जागेतला.

७.रड्या - गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा(रूदाली) होती म्हणून रड्या

८.गवत्या

९.दंगल्या

१०.लेंड्या - धनगरांची वस्ती असलेला

११.भांग्या - या मंदिराच्या परिसरात भांग विकला जायचा.

१२.बंदिवान -

१३.जिलब्या - हलवायांची दुकाने असलेल्यामुळे मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला ‘जिलब्या मारुती’

१४.तल्लीन -

१५. झेंड्या -

१६.पत्र्या -

१७.गोफण्या - आजच्या फरासखाना इथे पूर्वी चापेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीने "गोफण क्लब" सुरू केला आणि तो मारुती झाला ‘गोफण्या मारुती’.

१८.दक्षिणमुखी -

१९. गावकोस -

२०.वीराचा -

२१.आपला -

२२.शकुनि -

२३.पावन -

तुम्हाला पण पुण्यात असे अनेक मारूतीराय भेटले असतील.आठवा व लिहा त्यांच्याबद्दल !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page