top of page

पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना आलेले अनुभव - आमचा धीरोदात्त पॅथाॅलाॅजिस्ट

  • dileepbw
  • Aug 12, 2021
  • 1 min read

"पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना आलेले अनुभव - आमचे धीरोदात्त अध्यक्ष व खंबीर पॅथाॅलाॅजिस्ट"


पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी रक्त,व्हॅन, उपकरणे,रसायने इ.मदतीची साधने घेऊन दुपारी एकच्या सुमारास चिखलाने व कचर्‍याने भरलेल्या पूरग्रस्त महाड शहरातील रस्त्यांमधून वाट काढत कसेबसे रक्तपेढीत पोहोचलो.रक्तपेढीचा परीसर स्वच्छ करण्याचे कार्य सुरूच होते.गाडीतून उतरता क्षणी जेथे मोठी हानी झाली होती त्या बेसमेंटमधे धाव घेतली.


एका बाजूने गांधली व दुसर्‍या बाजूने काळ अशा दोन्ही नद्यांच्या प्रवाहांनी रक्तपेढीला चांगलाच दणका दिलेला दिसत होता.पाण्यात वेगाने वहात आलेल्या नारळाच्या झाडाने रक्तपेढीची संरक्षक भिंत उद्धस्त करून टाकलेली होती.पाच सहा फूट उंचीच्या दगडी चौरंगा वर सुरक्षितरित्या विराजमान केलेला 30 KVA ताकतीचा जनरेटर गलितगात्र होऊन पडलेल्या महावीरासारखा हताश होऊन आमच्याकडे पहात होता.दुसर्‍या बाजूला संपूर्ण महाड शहराला शवसेवा पुरविणारी "विद्युत शवपेटी" सुध्दा आमच्याकडे केविलवाण्या नजरेने पहात होती.जणू काही तिचा आत्माच हरवलेला होता.एका कोपर्‍यात विच्छिन्न अवस्थेतील फाऊलर्स बेड्स रक्तपेढीतर्फे पुरविल्या जाणार्‍या "रूग्णोपयोगी साहित्य केंद्रा" ची झालेली दुर्दशा दाखवित होता.मधोमध अजूनही चिखलाचे मोठे तळेच साठलेले दिसत होते.


डोळ्यातील अश्रू झाकत पायर्‍या चढून पहिल्या मजल्यावर आलो.स्वागताला सर्व सहकारी व कर्मचारी हजर होते.आम्हाला पहाताच विशेषत: महिला कर्मचार्‍यांच्या अश्रूंचा बांधच फुटला.त्यांचे सांत्वन करायला माझ्याकडे शब्दच नव्हते.आजपासून कामाला लागायचे आहे.आवश्यक ते सर्व काही सोबत आणलेले आहे एवढेच मोजके बोलून मी सभास्थानी जाऊन पोहोचलो.


जनकल्याण रक्तपेढी,महाडचे अध्यक्ष श्री.धनंजय परांजचे यांचा बांधकाम साहित्याचा सर्व व्यवसाय महापूरात वाहून गेला.जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ.माधव पवार यांच्या लॅबमधली एकुण एक उपकरणे एकतर दुरूस्तीला किंवा मोडीतच निघालेली.एवढा हादसा होऊनही दोघेही खंबीरपणे रक्तपेढीच्या पुनर्वसनासाठी कंबर कसून सिध्द झालेले पाहून माझ्याच मनाला उभारी आली.




 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Commentaires

Noté 0 étoile sur 5.
Pas encore de note

Ajouter une note
bottom of page