पंचमशाली लिंगायत वाणी
- dileepbw
- Sep 14, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
इसवी सन १८१८ साली ब्रिटीश लोकांनी केलेल्या भारताच्या जनगणनेच्या वेळी श्री. इथोवेन नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजाबद्दल खालील निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत :-
१. तत्कालीन मुंबई इलाख्यात "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज पंचमशाली व बिगर-पंचमशाली अशा दोन गटात विभागलेला आहे.
२. "पंचमशाली लिंगायत वाणी" म्हणजे तत्कालीन वैदिक धर्मातील जातीभेद व लिंगभेद याला कंटाळून "सर्व प्रथम" बाहेर पडलेले लोक.
३. "बिगर-पंचमशाली लिंगायत वाणी" म्हणजे "उशिरा" बाहेर पडलेले लोक.
४. त्यानंतर वैदिक धर्मातील जातीभेद व लिंगभेद याला कंटाळून वैदिक धर्मातील अनेक जाती व उपजाती वैदिक धर्मातून बाहेर पडल्या. त्यांनी जरी "शैव" पंथ स्वीकारला तरी ते आपल्या मूळच्या वैदिक धर्मातील जाती व उपजातीच्या नावांनीच "शैव" पंथात ओळखले जाऊ लागले. (उदा.लिंगायत अहिर, लिंगायत वाणी)
५. त्यानंतर वैदिक धर्मातील जातीभेद व लिंगभेद याला कंटाळून वैदिक धर्मातील अनेक "नीच" समजल्या जाणाऱ्या जाती व उपजाती वैदिक धर्मातून बाहेर पडल्या.पण "शैव" पंथ स्वीकारून देखील त्यांच्या जीवनमानात फारसा फरक पडला नाही.
६. त्यामुळे इसवी सन १८१८ साली ब्रिटीश लोकांनी केलेल्या भारताच्या जनगणनेच्या वेळी "शैव" पंथ स्वीकारलेल्या अनेकांनी पुन्हा वैदिक धर्मातील चार वर्णाप्रमाणेच जनगणना करण्याची मागणी केली.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments