top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १६"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १६"

©दिलीप वाणी,पुणे

या लेखात मी १९८२ च्या पांचगणीच्या MAPCON परीषदेबद्दल माहिती सांगतो.जरूर वाचा.तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व "बिनीचे शिलेदार" मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले. त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे, नागधवणे,भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो.

परोपरी गोपाळ डाॅ.विजय भंगाळे सोबत असल्याने खाण्या "पिण्या" ची काहीच चिंता नव्हती.भारतीय लष्कराकडून पुरेसा "दारू-गोळा" ताब्यात घेण्यात आला होता.पाच-सहाशे लोकांना पुरेल एवढा दारुगोळा जेमतेम डझनभर बीनीच्या शिलेदारांच्या चंगुलमें फॅंसा हुआ था ! त्याची वहातूक सुलभ व्हावी म्हणून सोबतीला OPD तला लॅब अटेंडंट "जमादार" याला घेतला होता.हा म्हणजे "चोराच्या हाती जमादारखान्याच्या किल्ल्या" असाच प्रकार होता हे पाचगणीला रात्री कळाले.सांगतो तो किस्सा.ती "धुंद वादळाची होती रात्र पावसाची" ! पण आधी हा किस्सा ऐका !

सूर्य मावळतीला आल्यावर सुरू करायचा कार्यक्रम भर मध्यानीच सुरू झाला.बाजूला खळखळ वहाणार्‍या झर्‍यातील पाणी जसे खुणावू लागले,तसे नागधवनेसर अस्वस्थ होऊ लागले.या पाण्याला "रंगीत" केले तर ? काय "बहार" येईल नाही ? नेहेमी निरनिराळ्या Fermentation Reactions करून दाखवणारे नागधवनेसर हाच प्रयोग पाचगणीच्या वाटेवर करून दाखऊ इच्छित होते.या "जादूच्या प्रयोगा" ला कोण नाही म्हणणार ? तिथेच एका तरूतळी, खळखळत्या झर्‍याकाठी,Reagents च्या बाटल्यांची वेगळीच "खळखळ" सुरू झाली व सगळेच श्रीरंग त्या रंगात रंगून गेले.


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page