"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
मी JR असतानाची गोष्ट ! Patho OPD त काम करताना मी WBC चा TLC देताना WNL व Normal Urine असताना NAD असे लिहीत असे.या दोन्ही शार्टफार्मचे लाॅंगफाॅर्मस मला काही दिवस माहितीच नव्हते.होते असे कधी कधी ! माझ्या एका प्राध्यापकाला RSVP व Agenda या शब्दांचे अर्थ तरी कुठे माहित होते ?
एकदा एका सर्जरी रेसिडेंटने मला WNL म्हणजे रे काय भाऊ ? असे विचारताच माझी चांगलीच तारांबळ उडाली होती.तो त्या आकड्यावरून पोट उघडायचे की नाही हे ठरवणार होता.
मग कळले हा "आकडा" CCL मधे निघतो.मग तिथे जाऊन ते काम शिकून घेतले.Patho OPD मधले कित्येक ज्येष्ठ नुसती स्लाईड पाहून हा "आकडा" कसा काय सांगायचे हे कोडे मला बरेच दिवस उलगडले नव्हते.खोदून खोदून विचारले तेव्हा एक "जादूचा आकडा" सांगण्यात आला व "खुल जा सिम सिम" म्हटले की जशी गुहेची शीळा उघडते तसा हा "आकडा" निघतो असे सांगण्यात आले.मला काही ते फारसे पटले नव्हते व ही "पॅथाॅलाॅजी का थापालाॅजी" अशी शंका मात्र मनात उद्भवली होती.असो.
Comments