"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३६"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३६"
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज !
बालपणी मला देश-विदेशातली "पोस्टाची तिकिटे" जमवायचा छंद होता.त्यामधे भूमितीमधील सर्व आकारांचीच नव्हे तर काही अभूमिती आकारांची{उदा.विविध फळे-केळी,सफरचंद,पेरू इ.) तिकिटे देखील होती.एक दक्षिण आफ्रिकेचे तिकिट तर "फुलस्केप" पाना एवढे मोठे होते.ही सगळी भावी "हिस्टो स्लाईड कलेक्शन" या छंदाची पायाभरणी होती हे तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही.
मुळात माझा पिंड शिक्षकाचा ! त्यामुळे पॅथॉलॉजी लॅब व रक्तपेढी अशा रुग्णसेवेच्या दोन आघाड्या सांभाळत असताना मी विद्यादानाच्या कामाकडे देखील दुर्लक्ष केले नाही.महाराष्ट्रातील अनेक संस्थांमधे(बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय,भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इम्युनोहिमॅटाॅलाॅजी,वालावलकर रुग्णालय,चिपळूण,सिंबायाॅसिस,द्वारका मेडीकल फाउंडेशनचे संगमनेरकर रुग्णालय इ.) अध्यापनाचे कार्य केले.जेथे जाईन तेथे जमतील तशा "हिस्टो स्लाईड्स" जमवत गेलो. MAPCON,IAPP,Pune Pathologist, PMC,समव्यावसायिक मित्र अशा मार्गांनी हजारो उत्तमातल्या उत्तम "हिस्टो स्लाईड्स" माझ्याकडे जमत गेल्या.
आगरवालसरांचे "हिस्टो स्लाईड्स संग्रहाचे संस्कार" रोमारोमात भिनलेले असल्याने तो माझा एक प्रकारचा "छंद"
च होऊन बसला होता.असा मोठा संग्रह मी निवृत्तीपश्चात वालावलकर रुग्णालय,चिपळूण या संस्थेने उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिला.त्याचे तेथील पॅथॉलॉजीस्ट डाॅ.राजश्री कुलकर्णी यांनी मनापासून स्वागत केले होते.असा हा "छंद माझा वेगळा" पुढच्या पिढीला उपयोगी ठरला,याचा मनस्वी आनंद आहे.
Commentaires