"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३७"
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३७"
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज ! माझ्या इंग्रजी कादंबर्या वाचण्याच्या छंदातील ऑर्थर हॅले यांची "The Final Diagnosis" ही पॅथॉलॉजीस्टच्या जीवनावर आधारलेली कादंबरी सर्वांनी वाचायलाच हवी.
"प्रताप-इंदू" या ससूनमधील प्रेमकहानीवर कादंबरी किंवा सिनेमा निघाला की नाही ते मला माहित नाही.पण "Three Counties Hospital,Pennsylvania,United States" या हाॅस्पिटलमधील माईकच्या प्रेमकहानीवर ऑर्थर हॅले यांनी १९५९ साली पॅथॉलॉजीस्ट केंद्रित "The Final Diagnosis" ही अत्यंत वाचनीय कादंबरी लिहीली व त्यावर एक उत्कृष्ट सिनेमा देखील निघाला.सांगतो.
Sir William Osler यांचे एक सुप्रसिध्द वाक्य आहे.“As is your pathology, so is your practice” ! शंभर वर्षांपूर्वीचे हे वाक्य अजूनही "चिरंतन" आहे.It remains a fact that pathology forms the bedrock of medicine !
या कादंबरीतला "Joe Pearson" म्हणजे आपले आगरवालसर ! Histo मधला राजा,पण Special stains व IHC अशा खर्चिक बाबतीत उदासीन ! त्यामुळे या रुग्णालयाचा व्यवस्थापक Surgeon-administrator Kent O'Donnell महसूल वाढवण्यासाठी IHC,Frozen sections,Clinico-pathologic conferences इ.गोष्टी
सुरू करण्याच्या मागे लागताच "Joe Pearson" यांचे स्थानच धोक्यात आले.
या कादंबरीत १९५९ सालचे वातावरण पुरेपुर पहायला मिळते.रुग्णालयच काय तर लॅब व डेड हाऊसमधे सर्रास "धूम्रपान" करणारे डाॅक्टर्स,संदेशवहनासाठी वापरले जाणारे टेलेग्राम्स,टेलेफोन ऑपरेटरकडून जोडले जाणारे लांब पल्ल्याचे काॅल्स इ.O’Donnell चा तो जगप्रसिध्द संवाद ! "Is it, in truth, a place of healing ? Or have we raised, in folly, a whited sepulcher — an empty, antiseptic shrine?"
१९५९ सालात महिलांना दिली जाणारा "दुय्यम वागणूक" या कादंबरीत छान वर्णन केलेली आहे.काय नाही या कादंबरीत ? धमेंद्रचा शोले मधला पाण्याच्या टाकीवरचा संवाद आठवतो ? त्या संवादाप्रमाणेच या कादंबरीत Suspense,Drama,Romance,Comedy,Tragedy सगळं काही आहे.This story is full of choices, disappointments, and hope ! It will keep you riveted to the last page.अवश्य वाचा.
Comments