top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४३"

  • dileepbw
  • Sep 2, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४३"

© दिलीप वाणी,पुणे

"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.पण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे नवीन "दही हंडी" फोडण्याची आवश्यकता आहे.पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील विशेषत: Rh discrepancies व HIV Screening मधील

"भांडणे" सोडवणे हा जनकल्याण रक्तपेढीमधला नित्याचाच विषय होऊन बसला होता.त्यामुळे काळाच्या ओघात त्याला संघटित स्वरूप देण्याची आवश्यकता भासू लागली.

"Rh discrepancies" resolve करण्यासाठी सर्व प्रकारच्या Anti-D(Human polyclonal,Hybridoma generated monoclonals & blends,Chemically modified इ.) संग्रही ठेवायला सुरूवात झाली.HIV Screening साठी देखील Generation I to IV व विविध Epitopes असलेल्या Rapid tests संग्रही ठेवायला सुरूवात झाली.Westen Blotting सुरू केल्यामुळे रिझल्टमधील तफावतींचा उलगडा होऊ लागला.त्यामुळे

"समुपदेशन केंद्र" अधिक चांगल्या पध्दतीने काम करू शकले. या अनुभवाचा "राष्ट्रीय धोरण" ठरवताना खूपच उपयोग झाला.अशा सुसज्ज "समुपदेशन केंद्र" मुळे सर्वच ठिकाणचे HIV बाधित धाव घेऊ लागले व संख्या हजारावर जाऊन पोहोचली.यातून NIV व NARI या संस्थांच्या विविध उपक्रमांना व संशोधनांना सहकार्य करता आले.

सुरूवातीच्या काळात HIV ला काहीही उपचार उपलब्ध नव्हते. खूप उशीराने Zidovudin आले खरे व ते आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नव्हते.मग त्यांच्यासाठी आम्ही काय केले असावे ? वाचा पुढच्या लेखात !

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page