"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४४"
- dileepbw
- Sep 2, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४४"
©दिलीप वाणी
सुरूवातीच्या काळात HIV ला काहीही उपचार उपलब्ध नव्हते.खूप उशीराने Zidovudin आले खरे पण ते आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नव्हते.मग "HIV Reactive" रक्तदात्यांना काय उपचार द्यावे या संभ्रमात पडलो.खरे तर संपूर्ण जगच या संभ्रमात होते.जो तो देश आपआपल्या "संस्कृती" मधे काय उपचार सापडतात याचा "धांडोळा" घेत होते.
त्यात अमेरिकेतील चीनी मूलाच्या शास्त्रज्ञांना यश आले. त्यांनी "GLQ 223" असे सांकेतिक नाव दिलेले एक औषध "चीनी काकडी" पासून शोधून काढले.त्याने नुसता CD4-CD8 Ratio च वाढत नसून HIV Viral Load देखील कमी होतो असे प्रयोगाअंती सिध्द झाल्याने US FDA ने त्याला मान्यता देखील दिली.
हे संशोधन मी "American Association of Blood Banks(AABB)" या संस्थेच्या "Blood Bank Week" या साप्ताहिकात वाचताच मला देखील उत्साह आला व मी भारतीय संस्कृतीमधील "आयुर्वेद" या शास्त्राचा "धांडोळा" घेण्यास सुरूवात केली.त्यात "व्यवायशोष" नावाचा एक HIV सदृश आजार सापडला ज्याचा उपचार होता "भारतीय काकडी(वाळूक/Cucumis sativus) !
हे वाचताच माझा उत्साह शिगेला पोहोचला व मी अनेक वैद्य(खडीवाले,नानल, गोगटे,जोशी,सरदेशमुख,शेंडे इ.),NIV चे संशोधक(विद्या अरणकल्ले) व माझे औषधशास्त्रातले वर्गमित्र(घोंगाणे,डांगे) यांच्याशी चर्चा करून एक "संशोधनाचा उपक्रम" तयार केला.पण त्याला "एथिकल कमिटी" ची मान्यता मात्र मिळवू शकलो नाही.
१९८९ साली सुरू केलेला हा उपक्रम अनेक वर्षे चालला. त्याला मिलिंडा गेट फाऊंडेशनने आर्थिक सहकार्य देऊ केले होते.पण त्यांच्या अटी इतक्या जाचक होत्या की त्या आमच्या सेवाभावी संस्थेला झेपण्यासारख्या नव्हत्या.या उपक्रमाला अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष "बिल क्लिंटन" यांचे पत्ररुपी आशिर्वाद लाभले होते हे विशेष !
Comments