top of page

पिलखोडचा चित्रकार केकी मूस

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 2 min read

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास

"सका/शक/Scythian" वंशाच्या,"ऋषिका" या जमातीचे लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधव मध्य आशियातून पाकिस्तान, काश्मीर, हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात व शेवटी महाराष्ट्रामध्ये नर्मदा, तापी, गिरणा इ. नद्यांच्या खोऱ्यात स्थिरावले.

या जनसमूहामधील "देव" कुलाचे बरेचसे घटक मुख्यतः जळगाव जिल्यामधील चाळीसगाव तालुक्यातील "पिलखोड" (Coordinates: 20°31'54"N 74°49'1"E, PIN Code - 424101) या चाळीसगाव पासून २० कि.मी अंतरावरील, "गिरणा" नदीच्या काठावरील गावामधे येउन स्थिरावले.

लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांचे कुलग्राम असलेल्या "पिलखोड" येथील "भास्कराचार्यां" सारखेच दुसरे एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे छायाचित्रकार व चित्रकार "केकी मूस" !

चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळ "कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान" या नावाने आजही एक संस्था कार्यरत आहे. जागतिक कीर्तीची ३०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके पटकावणाऱ्या या थोर चित्रकाराच्या या स्मृतीला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, थोर समाज सेवक बाबा आमटे, राजकारण व समाजकारणा मधील जयप्रकाश नारायण,शंकर देव,साने गुरुजी, पंडित महादेव शास्त्री जोशी, महर्षी अण्णासाहेब कर्वे, थोर लेखक ना.ह.आपटे, प्रा. ना.सि.फडके,श्री.म.माटे,आचार्य अत्रे तसेच गीतकार वसंत देसाई यांनी आवर्जून भेट दिली आहे.

मुंबईचे छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक (विक्टोरिया टर्मिनस) बांधणारे पारशी गृहस्थ श्री.आर.सी.कॉनट्राक्टर यांची बहीण पिरोजा व तिचे पती श्री.मानेकजी फ्रामजी मूस यांचा हा २ ऑक्टोबर,१९१२ रोजी जन्मलेला पुत्र 'कैखूसरू" उर्फ "केकी" !

जन्मतः कलाकार असलेला हा प्राणी काही काकाच्या बांधकाम व्यवसायात रमला नाही. चाळीसगाव मधील वडिलांच्या सोडावाटरच्या धंद्यात ही त्याचे मन रमेना.असा हा कलंदर माणूस व्ही.रेम्ब्रात नावाच्या दुसऱ्या एका कलाकाराच्या कलाकृतींच्या प्रेमात पडला. त्याचे साहित्य त्याने मराठी व गुजराती भाषेमध्ये भाषांतरित केले. एवढेच नव्हे तर स्वतःच्या घराचे "आशीर्वाद" हे नाव बदलून "रेम्ब्रात" केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९८३ साली " LIFE AND STILL LIFE" या नावाने "केकी" वर एक पुस्तक प्रकाशित केले. चित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, सितारवादक, संगीताचा भोक्ता अशा एक ना अनेक रुपात जगाने "केकी"ला पहिले. विविध कलाकृती, शिल्पे, काष्ठे, पुतळे, बोन चायनाची भांडी, क्रोकरी, खेळणी, जुने फर्निचर, जुनी नाणी जमा करण्याचा "केकी"ला छंद होता."केकी" ला पुस्तकांचाही बराच व्यासंग होता. सुमारे ४००० हून जास्त पुस्तके व काव्यसंग्रह त्याच्या संग्रही होते.

अशा या कलंदर माणसाचा मृत्यू ३१ डिसेंबर,१९८९ रोजी लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांचे कुलग्राम असलेल्या चाळीसगाव तालुक्यात झाला. "केकी" च्या मृत्यूपश्चात या सर्वे वस्तूंचे संग्रहालय लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांचे कुलग्राम असलेल्या "चाळीसगाव" येथे उभे करण्यात आले आहे.

खंत वाटते ती या गोष्टीची की लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील,विशेषतः "देव" कुलामधील कोणीही व्यक्ती अशी जगावेगळी वाट चोखाळू शकलेली नाही.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 

Commentaires

Noté 0 étoile sur 5.
Pas encore de note

Ajouter une note
bottom of page