top of page

बच्चन का श्रीवास्तव ?

  • dileepbw
  • Oct 11, 2022
  • 1 min read

"अमीताभ हरीवंशराय श्रीवास्तव(बच्चन) यांचा वाढदिवस"

"अमीताभ हरीवंशराय श्रीवास्तव(बच्चन)" यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांना भेटण्याचा योग मला दोन वेळा आला.पहिल्यांदा मी पनवेलच्या काॅलेजमधे शिकत असताना "शोले" चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी पनवेल-आपटा रेल्वे लाईनवर ! तर नंतर ४० वर्षांनी मुंबई विमानतळावरील "ली मेराडीयन" हाॅटेलमधे एका वैद्यकीय परिषदेला ते प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असताना.असो.

अमीताभ "श्रीवास्तव" चे "बच्चन" कसे काय झाले ? ऐकण्यासारखा आहे किस्सा !

आपल्याला अकरावीत असताना हिंदीला मुन्शी "प्रेमचंद" यांचा "शतरंजके खिलाडी" नावाचा एक धडा होता.आठवतो ? त्याच्या लेखकाचे खरे नाव माहित आहे ? श्री.धनपतराय श्रीवास्तव !

जातीयवादाचा तीव्र निषेध करणारे,स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे व श्रमजीवींसाठी विशेष आपुलकी बाळगणारे श्री.धनपतराय श्रीवास्तव यांनी आपल्या "कायस्थ" असण्याचे द्योतक असलेल्या "श्रीवास्तव" या आडनावाचा त्याग करून आधी "नवाब राय" व नंतर "प्रेमचंद" हे नाव धारण करून साहित्य सेवा केली.

स्वत:ला "चित्रगुप्त" यांचे वंशज समजणारे हे "कायस्थ" लोक समाजाचा लेखा-जोखा लिहिणारे, समाजाचे व्यवस्थापन करणारे व लष्करी सेवा हे परंपरागत व्यवसाय करणारे पंडीत,ठाकूर,लाला अशा नावांनी ओळखले जाणारे लोक ! "श्री" म्हणजे "देव" व "वसत्" म्हणजे "वास्तव्य" ! मनात देवांचे वास्तव्य असलेले ते "श्रीवास्तव" ! यांचे पूर्वज "श्रीवस्तू/सुवस्तू/स्वात" या नदीच्या तीरावर वास्तव्याला होते.म्हणून ते "श्रीवास्तव" ! अशा या

"श्रीवास्तव" घराण्यात जन्मलेले "अमीताभ हरीवंशराय श्रीवास्तव" हे "बच्चन" कसे काय झाले ? ऐका हा किस्सा !

अमीताभच्या तीर्थरुपांना म्हणजे हरीवंशरायना घरी लाडाने "बच्चा" असे म्हणत असत.स्वातंत्र्योत्तर

काळात "जातीयवाद" संपुष्टात आणण्यासाठी हरीवंशराय यांनी "प्रेमचंद" यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या "श्रीवास्तव" या जातीवाचक आडनावाचा त्याग केला व "बच्चा" या घरगुती नावानेच आपली साहित्य सेवा द्यायला सुरूवात केली.या "बच्चा" च्या अनुनासिक उच्चारावरून "बच्चन" हे नाव रूढ झाले व अमीताभ यांनी त्याच नावाने आपली कलेची उपासना पुढे चालू ठेवली आहे.या सेवेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page