"भारतीय रागदारी - भाग - १३अ"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी - भाग - १३अ"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्यां" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.या लेखमालेवर उदयने आधीच "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.पण कधी नव्हे ती अंजली मंगरूळकर या विषयावर बोलती झाली आहे.तेव्हा ऐका तर खरं ! ती काय सांगते आहे ते ! भारतीय रागदारीमधे काय वैशिष्ट्य असते संगीतकारांचे ? वाचा.
बर्याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा?' याचा अंदाज बांधता. बर्याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.याची तोंडओळख राजा व निक्याने मला वसतीगृहात करून दिली होती.ओ.पी. नय्यरच्या संगीतातील "घोड्यांच्या टापा" व आर.डी.च्या संगीतातील सेक्साफोन मला हळूहळू टिपता यायला लागला होता.माझ्या सुदैवाने गेली ५० वर्षे मला असा "केशकलाकार" भेटला आहे की ज्याला स्वत: लाच "संगीतकार" व्हायचे होते. त्यामुळे महिन्यातून एकदा माझा केशकर्तनालयात
"संगीत वर्ग" चालू असतो.तेथे प्राप्त झालेले ज्ञान सांगतो.ऐ.का
१.इंटरल्युडचे पीसेस - शंकर जयकिशन,नदीम श्रवण व जतिन ललित
२.लांबलचक ऑर्केस्टा पीसेस - आरडी बर्मन
३.वेगवेगळ्या वाद्यांचा चौकट मोडून वापर -
ए.आर.रेहमान :-
४.प्रत्येक अंतर्याला वेगळे संगीत,मुखडा व अंतरा
यांना वेगळा ठेका - राजेश रोशन
५.भैरवीच्या सुरावटीचा सढळ वापर व अॅकॉर्डियनवर जोर - शंकर जयकिशन
६.इंग्रजी बँन्डचा सुंदर वापर - सी.रामचंद्र
७.तालवाद्याचा वापर न करता सजवलेल्या सुरेल, तालबद्ध रचना - हेमंतदा
८.विशिष्ट आवाजाचा फील येण्यासाठी स्वतः शोधून काढलेली अपारंपारिक वाद्ये - आर.डी.
ओ.पी.नैय्यर ह्यांचा "टांग्याचा ठेका" जसा फेमस आहे,तसाच सचिनदा यांचा काँप्लेक्स "भारतीय अॅरेंजमेंट आणि वेस्टर्न सिंफनीज" चा मेळ !
तर मदन मोहन म्हणजे अतिशय हळूवार सूर व ट्रीटमेंट.एकही सूर उफाड्याचा नाही ! सलील चौधरी ह्यांचे संगीत देखील जाणकारांना लगेच ओळखता येते.
Comments