top of page

"भारतीय रागदारी - भाग - १५"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 1 min read

"भारतीय रागदारी - भाग - १५"

©दिलीप वाणी,पुणे

अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी एका विशिष्ट "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" हे गाणे अभ्यासासाठी घेऊ या.कशाची आठवण होते हे गाणे ऐकून ?

शंकर एहसान लाॅय या संगीतकारांनी ते "दिगंबरा हो दिगंबरा" या दत्ताच्या लोकप्रिय आरतीच्या चालीवर बांधलेले हे गाणे आहे.दोन्ही गाण्यांचा "राग" एकच ! कोणता ? भारतीय "रागदारी" मधे संगीतकारांबरोबरच गीतकारांचे महत्व किती मोठे आहे ते या उदाहरणावरून लगेच कळून येते. "कजरा रे कजरा रे" या गाण्याचा अर्थ साधा,सरळ व सोपा आहे.पण त्याच "रागा" तील “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या महामंत्राचे माहात्म्य मात्र काही औरच आहे.वाचा.

भावनांना खास "गुलजारी टच" लाभल्यानंतर त्या भावभावनांच्या कल्लोळाला एक "लय" प्राप्त होते, ती गाण्यांच्या रूपांतून रसिकांच्या मनात कायमची घर करते.गुलजार यांच्या लेखणीची जादू कशी आहे पहा."रुके रुके से कदम (मौसम)" ऐकल्यावर आता चाळिशी पार केलेल्या एका पिढीला जसे कासावीस होते,तसेच "कजरा रे कजरा रे(बंटी और बबली)" ऐकल्यावर आज केजीत असणार्‍या मुलाची कळीही खुलते.

आता त्याच "रागा" त बांधलेले “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या महामंत्राचे माहात्म्य" ऐका.

दिगंबराची धून चालू असताना तन्मय अवस्था प्राप्त होणे ही ईश्वराची मोठी कृपा आहे. ‘मदभक्ता: यत्र गायंती तंत्र तिष्ठामि नारद’ असे भगवंत नारदाला म्हणतात. तेंव्हा जिथे असं ईश्वराचे भजन, गायन चालू असते त्या ठिकाणी ईश्वराचा निवास असतो.

या महामंत्राचा अर्थ विशद करण्याकरिता सदगुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एक आरती केली आहे. त्या आरतीचा विचार आज यथामती थोडासा करावयाचा आहे.‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे शब्द मूळ संस्कृत असल्याने "मंत्ररूप" आहेत.

नीट "चाल" लावा."कजरा रे कजरा रे" मधे सुध्दा तुम्हाला 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च ऐकू येईल.हीच तर भारतीय रागदारीची किमया आहे.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page