"भारतीय रागदारी - भाग - १८"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी - भाग - १८"
©दिलीप वाणी,पुणे
अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी "भैरव" या "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" या गाण्याचा आपण अभ्यास केला.पक्याने रागांचा आरोग्यावर परिणाम होतो का असे विचारल्याने हा लेख लिहित आहे.वाचा.
राग दुर्गा : आत्मविश्वास वाढविणारा.
राग यमन : कार्यशक्ती वाढवणारा.
राग देसकार : उत्थान व संतुलन साधणारा.
राग बिलावल : आध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
राग हंसध्वनी : सत्य-असत्याची जाणीव करून देणारा राग.
राग श्यामकल्याण : मूलाधार उत्तेजित करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
राग हमीर : आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा.
राग केदार : स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करून भरपूर ऊर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा.
राग भूप : शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
राग अहिरभैरव : शुद्ध इच्छा, प्रेम आणि भक्तिभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरणनिर्मिती करून समाधान देणारा.
राग भैरवी : इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृद्धिंगत करणारा असा राग.
राग मालकंस : अतिशय शांत - मधुर राग, प्रेमभाव निर्माण करणारा व सांसारिक सुख वृद्धिंगत करणारा.
राग भैरव : शांत वृत्ती व शुद्ध इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून, शिवतत्त्व जागृत करणारा असा आहे.
राग जयजयवंती : सुखसमृद्धी देणारा राग असून, यशदायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
राग भीमपलासी : संसारसुख व प्रेम देणारा.
राग सारंग : कल्पनाशक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो. आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
राग गौरी : शुद्ध इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहीशा करणे.
१.हृदयरोग - राग दरबारी व राग सारंग
-झनक झनक तोरी बाजे पायलिया... .(मेरे हुजूर)
-तोरा मन दर्पण कहलाए.... (काजल)
-बहुत प्यार करते है, तुमको सनम.... (साजन)
-जादूगर संय्या छोडो मेरी (नागिन)
२.विस्मरण(लक्षात राहत नाही) - त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा.
-मेरे नयना सावन भादों.... (मेहबूबा)
-ओ मेरे सनम.... (संगम)
-दिल के झरोखे मे तुझको बिठाकर.... (ब्रह्मचारी)
-जाने कहा गये वो दिन.... (मेरा नाम जोकर)
३.मानसिक ताण, अस्वस्थता - ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल, त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंतीवर आधारित गाणी ऐकावीत.
-पिया बावरी.... (खूबसूरत)
-मेरे सूर और तेरे गीत.... (गूँज उठी शहनाई)
-मतवारी नार ठुमक ठुमक चली.... (आम्रपाली)
-३तेरे प्यार मे दिलदार .... (मेरे मेहबूब)
४.रक्तदाब - हाय ब्लड प्रेशरसाठी हळू (धीमी गती) चालीची, तर लो ब्लड प्रेशरसाठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.
५.उच्च रक्तदाब
-चल उड़ जा रे पंछी .... (भाभी)
-चलो दिलदार चलो .... (पाकीजा)
-नीले गगन के तले.... (हमराज)
-ज्योती कलश छलके .... (भाभी की चूड़ियाँ)
६.कमी रक्तदाब
-जहाँ डाल डाल पर .... (सिकंदरे आज़म)
-पंख होती तो उड़ आती रे .... (सेहरा)
-ओ नींद ना मुझको आये (पोस्ट बॉक्स नं. ९०)
७.रक्तक्षय,ॲनिमिया - अशा वेळी राग पिलूवर आधारलेली गाणी ऐकावीत.
-खाली शाम हाथ आई है.... (इजाजत)
-आज सोचा तो आँसू भर आये.... (हँसते जख्म)
-नदीयाँ किनारे.... (अभिमान)
-मैने रंग ली आज चुनरिया.... (दुल्हन एक रात की)
८.अशक्तपणा - शक्ती, ताकद कमी झालेली वाटतेय, उत्साहाचा अभाव, काही करण्याचा कंटाळा येतो, अशा वेळी राग जयजयवंतीवर आधारित गाणी ऐकावी.
-मोहब्बत की राहों मे चलना संभलके.... (उड़न खटोला)
-मनमोहना बड़े झूठे... (सीमा)
-साज हो तुम आवाज हूँ मै.... (चंद्रगुप्त)
९.पित्तविकार,ॲसिडिटी
ॲसिडिटीवर उपाय म्हणून राग खमाजवर आधारित असलेली गाणी ऐकावीत.
-छूकर मेरे मन को.... (याराना)
-तुम कमसीन हो नादा हो.... (आई मिलन की बेला)
-आयो कहाँ से घनश्याम.... (बुढ्ढा मील गया)
-तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये.... (सेहरा)
Comments