"भारतीय रागदारी - भाग ४"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी - भाग ४"
©दिलीप वाणी,पुणे
"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्या" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.
जनचित्ताचे रंजन करणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात "राग" असे म्हणतात.स्वरांचा सुंदर प्रभाव पडतो.शास्त्रीय गायनात अथवा कोणत्याही प्रकारच्या गायनात सुस्वरता,स्वरबद्धता, आरोह,अवरोह,तालबद्धता, मार्दव व रंगत आणण्यासाठी करण्यात आलेल्या विशिष्ट सांगीतिक रचनांना संगीतातील "राग" असे म्हणतात.
रञ्जयति इति राग:| जो श्रोत्यांच्या मनाचे रंजन करतो तो "राग" होय.जीवन म्हणजेच एक "संगीत" आहे ! तर राग हे "थाटा" तून उत्पन्न झालेले आहेत. प्रत्येक थाटाच्या वैशिष्ट्यानुसार त्या त्या रागाची मांडणी केली जाते.
भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया "समयचक्रा" वर आधारित आहे. विशिष्ट राग गाण्याची एक ठरावीक वेळ सांगितली गेली आहे. राग गायनासाठी ८ प्रहर आहेत. पहाटे, दिवसाच्या प्रथम प्रहरी, दुसऱ्या प्रहरी, दुपारी, रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या प्रहरी गावयाचे राग आणि त्यांच्या विशिष्ट वेळा ठरलेल्या आहेत. संधिप्रकाशात गाण्याचे रागही आहेत. प्रातःकालीन आणि सायंकालीन संधिप्रकाश राग वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
प्रत्येक रागाचे स्वरूप भिन्न असते. रागातील स्वर, त्यातील शुद्ध, कोमल स्वर, त्याचे वादी-संवादी, आरोह-अवरोह, पकड आणि विस्ताराची पद्धत या सर्व गोष्टी प्रत्येक रागासाठी वेगवेगळ्या असतात.
रागात "वादी स्वर" हा राजाप्रमाणे, "संंवादी" हा मंंत्र्याप्रमाणे, "विवादी" स्वर हा शत्रूप्रमाणे तर "अनुवादी" स्वर हा सेवकाप्रमाणे असतो असे संंगीतशास्त्र मानते.
आता "रांगां" ची काही उदाहरणे सांगतो.ती अवश्य वाचा.
अहिरभैरव,अल्हैया बिलावल,अडाणा,अभोगी, कलावती,काफी,केदार,कलिंंगडा,कौशी,कानडा, खमाज,खट,खमाजी दुर्गा,खंंबावती,गावती, गांंधारी,गारा,गुणकली,गुजरी तोडी,गौड मल्हार, गौड सारंंग,गौरी ( पूर्वी आणि भैरव थाट),गोरख कल्याण,गौड मल्हार,चंद्रकंस,चारुकेशी,चाॅंदनी केदार,छायानट,जयंंत मल्हार,जलधर केदार,जैत कल्याण,जौनपुरी,जोगकंंस,जयजयवंती,जोग,
जोगिया,झिंंझोटी,तिलक कामोद,तिलंग,तोडी, दरबारी कानडा,दुर्गा,देस,नंंद,नट भैरव,नट मल्हार,नट केदार,नारायणी,देसकार,पटदीप, पहाडी,पिलू,राग पूरिया धनाश्री,पूरिया कल्याण, पूर्वी,बागेश्री,बिहाग,बसंंत,बंंगाल भैरव,बसंंत बहार,बिलावल,बिहाग,बिहागडा,बिलासखानी तोडी,बैरागी,भीमपलासी,भूप,भूपकली,भैरव,भैरवी,भटियार,भूपाल तोडी,मल्हार,मारवा,मारुबिहाग
,मालकंस,मियाँ मल्हार,मधुवंंती,मधुमाद सारंंग, मेघमल्हार,मांंड,मुलतानी,यमन,रागेश्री
,रामकली,रामदासी मल्हार,ललित पंंचम,ललत, वृंदावनी सारंग,विभास(भैरव थाट),शंकरा, शिवरंजनी,श्याम कल्याण,शुद्ध कल्याण.शिवमत भैरव,श्री (राग),सारंग,सोहनी,सूर मल्हार,राग हमीर,हंसध्वनी,हिंंडोल,अभोगी कान्हडा, अडाना,अहीर भैरव इ.
उत्तर भारतीय संगीतात देखील हेच राग प्रचलित आहेत.त्यांची उत्तर भारतीय नावे खालील प्रमाणे :-
अल्हैया,बिलावल,बागेश्री,बहारबैरागी,बैरागी तोडी,बसन्त,बसन्त मुखारी,भैरव,भैरवी, भटियार,भीम,भीमपलासी,भूपाली,भूपाल, तोडी,बिहाग,बिहागड़ा,बिलासखानी,तोडी, चन्द्रकौन्स,चारुकेशी,छाया,नट,दरबारी कान्हडा,देस, देशकार,देसी,देव,गन्धार,देवगिरि, बिलावल,देव,श्रीधनाश्री(भैरवी अंग),धानी,दुर्गागौड, मल्हारगौड,सारंगगौरी(भैरव अंग),गोपिका,बसन्तगोरख,कल्याण,गुणकली,
गुर्जरी,तोडी,हमीर,हंसध्वनी,हंसकिंकिणी,हरिकौन्स,हेमंत,हेमश्री,हिन्डोल,जयजयवन्ती,जलधर, केदार,जौनपुरी,जयत,झिंझोटी,जोगजोगेश्वरी,पंचम, जोगेश्वरी,जोगिया,जोग,कौंस,काफी,कलावती,
कामोद,कौशिक,ध्वनी (भिन्न-षड्ज),कौसी, कान्ह्डा,केदार,कीरवाणी,खमाज,खम्बावती,कोमल-रिषभ,आसावरी,ललित,लंका-दहन, सारंग,मधुकौंस,मधुमाद,सारंग,मधुवन्ती, मालगुंजी,मल्हार,मालकौन्स,मांड,मारू,बिहाग, मारवा,मेघ मल्हार,मोहन,कौन्स,मुलतानी, नंद,नारायणी,नायकी,कान्हडा,नट भैरव,परमेश्वरी,पटदीप,पीलूपूरिया,पूरिया धनाश्री,पूरिया कल्याण,पूर्वी,रागेश्री,रामदासी, मल्हार,रामकली,सालग,वरालीसारंग (बृंदावनी सारंग),सरस्वती,सरस्वती केदार,शहाना कान्हडा, शंकरा,शिवरंजनी,शोभावरी,श्रीशुद्ध कल्याण,शुद्ध सारंगश्याम,कल्याणसिन्धु,रासोहनी,सुहासुघराई, सुन्दरकली,सुन्दरकौन्स,सूरदासी,मल्हार,तिलक कामोद,तिलंग,तिलंगबहार,तोडी,वाचस्पती, विभासयमन इ.




Comments