"मणिपूर संघर्षामागचे अनुवंशशास्त्र"
- dileepbw
- Sep 6, 2023
- 3 min read
"मणिपूर संघर्षामागचे अनुवंशशास्त्र"
©दिलीप वाणी,पुणे
दि.९ सप्टेंबर २०१९ रोजी लिहीलेला अनुवंशशास्रावरचा माझा एक लेख सादर करतो.त्यात एक वाक्य होते.वाचा."Genes are the piano keys but the environment plays the song“मणिपूर संघर्षाचे मूळकारण हे "अनुवंशशास्रा" त दडलेले आहे.१०% सपाट जमीन कोणाची व ९०% डोंगराळ जमीन कोणाची हा येथे महत्वाचा "environment factor" आहे.मैतींचे Scythian genes व कुकींचे Mongol genes याpiano keys सुरात नसल्यामुळे तेथील "राष्ट्रगीत बेसुरे झालेले" आहे.वाचा.https://m.facebook.com/groups/564798883663480/permalink/1830043660472323/?mibextid=Nif5oz
ज्यांना सध्याचा 'मणिपूर संघर्ष" समजावून घ्यायचा आहे त्यांनी त्यामागचे हे "अनुवंशशास्त्र" अवश्य समजावून घ्यायला हवे.वाचा.https://m.facebook.com/groups/564798883663480/permalink/2246039302206088/?mibextid=Nif5oz
"हूण" लोकांनी "शक" लोकांना हुसकावून लावले असा प्राचीन लावले असे प्राचीन इतिहास सांगतो.तेच सध्या मणिपूरला चालू आहे.History repeats ! वाचा.
मणिपूर संघर्षात परस्परांच्या जीवावर उठलेल्या कुकी(हूण) व मैती(शक) लोकांनी कुशाणांबरोबर "DULO" या नावाचे राजकीय संघटन केल्याचा इतिहास सापडतो.हाच मणिपूर संघर्षावर उपाय आहे.वाचा.https://m.facebook.com/groups/564798883663480/permalink/2086279564848730/?mibextid=Nif5oz
मणिपूर संघर्षात परस्परांच्या जीवावर उठलेल्या कुकी(हूण) व मैती(शक) लोकांच्या पूर्वजांचे गणवेश कसे असत ? वाचा.https://m.facebook.com/groups/564798883663480/permalink/1862112287265460/?mibextid=Nif5oz
मणिपूर संघर्षावर कायमचा उपाय म्हणजे कुकी(हूण) व मैती(शक) लोकांमधे परस्पर विवाह ! वाचा.https://m.facebook.com/groups/564798883663480/permalink/658323294311038/?mibextid=Nif5oz
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल.त्या मधे हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.
दि.९ मे,२०१८ रोजी Gemma Tarlach या संशोधकाने "Discover" या संशोधनपत्रिकेत सादर केलेला "Ancient DNA Reveals New Human History of Eurasian Steppes" हासंशोधनपर लेखातील लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी माहिती थोडक्यात सादर करीत आहे.डेन्मार्क येथील संशोधक Eske Willerslev यांनी हातात घेतलेल्या एका मोठ्या अनुवंशशास्त्राच्या अभ्यासात लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात झालेल्या स्थलांतरावर मोठा प्रकाश पडला आहे.
लाड सका (शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज भारतात येण्यापूर्वी हूण व मंगोल लोकांबरोबर मध्य आशियातील "सायबेरिया" या गवताळ प्रांतात वास्तव्याला होते.जसे त्यांनी घोडा या प्राण्याला माणसाळवले तसे त्यांच्या हालचालींना गती प्राप्त झाली व ते पश्चिमेला युरोपपर्यंत व दक्षिणेला भारतात पसरले.गती प्राप्त झाल्यामुळे त्यांची संस्कृती व भाषा मंगोलियापासून ते थेट युरोपपर्यंत सर्वत्र पसरली.आशिया व युरोप यांना जोडणारा रेशीम मार्ग(Silk route) हा या विविध संस्कृतींच्या प्रसाराचा राजमार्ग बनला."Ancient DNA Reveals New Human History of Eurasian Steppes" या संशोधनपर लेखात Willerslev या संशोधकाने या विविध लोकांच्या जनुकांच्या(Genes) केलेल्या अभ्यासवर आधारित असा इ.स.पूर्व २५०० पासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला आहे. Willerslev या संशोधकाच्या मते घोड्यामुळे प्राप्त झालेली गती, धातूशास्त्राचे ज्ञान व लढाऊ वृत्ती लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांना ५००० वर्षांपासून शेती करून जगणार्या स्थानिक शेतकर्यांवर वर्चस्व गाजवित भारतापर्यंत घेऊन गेली.
Willerslev या संशोधकाच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की लाड सका (शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज अनुवंशिकदृष्ट्या भिन्न भिन्न गटात मोडणारे लोक होते.त्यामुळे या संशोधनाचे मुख्य संशोधक Peter de Barros Damgaard यांनी असा निष्कर्ष काढला आहे की भारतात आलेले "सका/शक/Scythian" लोक हे मध्य आशियातील विविध भागातून, वेगवेगळ्या काळात, गटागटाने (Yamnaya and Afanasievo cultures)भारतात आलेले लोक आहेत.या पूर्वी पूरातत्व शास्त्रज्ञांनी तसेच इंडो-इराणी भाषा तज्ञांनी देखील असेच अनुमान वर्तविले होते.हे दोन काळ ताम्रयुगापूर्वीचे तसेच ताम्रयुगानंतरचे (३२००-४३०० वर्षांपूर्वीचे) आहेत.
या सर्व संशोधनाला पुष्टी देणारा Ashley Cowie या शास्त्रज्ञाने दि.५/९/२०१९ रोजी लिहिलेला "Way to Revealing Denisovan DNA Secrets" हा लेख नुकताच वाचनात आला.त्यातील महत्वाचा भाग समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांच्या माहितीसाठी प्रसृत करीत आहे.
रशियातील "Denisova Cave (Soloneshensky District, Altai Territory)" या गुहेत सापडलेले सुमारे सात लाख वर्षांपूर्वींचे मानवी अवशेष लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्याही पूर्वजांचे (Denisovans) आहेत असे हे संशोधन सांगते. Denisovans(Neanderthals लोकांचे चुलतभाऊ) लोक सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी सायबेरियाच्या (युरेशिया) गवताळ प्रदेशात अस्तित्वात होते असे त्यांच्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून (हाडापासून बनविलेली हत्यारे व दागिने) लक्षात येते.याचा सर्वप्रथम पुरावा इ.स.२००८ साली सायबेरिया प्रांतातील अल्ताई येथे झालेल्या उत्खननात सापडला आहे.तर Higham या शास्त्रज्ञाच्या मते हे Denisovans लोक सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी सायबेरिया प्रांतातून तिबेटच्या दिशेने स्थलांतरित झाले.याचे पुरावे चीनमधील(Baishiya Karst cave, Xiahe, Gansu) उत्खननात सापडले आहेत.शास्त्रज्ञांनी Denisovans व Neanderthals या आदिमानवांचा एक लाख वर्षांपूर्वीचा संकर(Denny) शोधून याला पुष्टी दिली आहे.काळाच्या ओघात सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी Denisovans व Neanderthals या आदिमानवांच्या दोन्ही प्रजाती नष्ट झाल्या.
जनुकीय संशोधनातून अशी माहिती मिळविताना Bill Sullivan यांचे Nat Geo या संशोधनपत्रात प्रसिध्द झालेले खालील वाक्य ही लक्षात घेण्यासारखे आहे : -
"Genes are the piano keys but the environment plays the song“
त्यामुळे वातावरणात असे काय बदल होत गेले की "Denisovans" लोकांपासून "सका/शक/Scythian" व त्यांच्यापासून लाड सका (शाखीय) वाणी लोक निर्माण होत गेले,याचा अभ्यास व्हायला हवा.
आपला कृपाभिलाषी,प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणीव्यवस्थापकफेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)
Comments